Manipur Violence : भयंकर! "जमावाने माझं घर जाळलं, माझ्या पती-मुलाची हत्या केली; मुलीला घेऊन गेले अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 12:01 PM2023-07-22T12:01:30+5:302023-07-22T12:10:52+5:30
Manipur Violence : पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आरोपीने महिलेसोबत भयंकर कृत्य करण्यापूर्वी महिलेचे वडील आणि भावाचा तिच्यासमोरच खून केला होता.
मणिपूरमधील धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांनी या घटनेचा निषेध केला आला. पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आरोपीने महिलेसोबत भयंकर कृत्य करण्यापूर्वी महिलेचे वडील आणि भावाचा तिच्यासमोरच खून केला होता. पीडितेच्या आईने सांगितले की हा भीषण अनुभव सांगितला आहे. पीडित महिलेच्या आईला मोठा धक्का बसला आहे.
मणिपूर सरकारने हिंसाचार थांबवण्यासाठी किंवा लोकांचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी पावले उचलली नसल्याचा आरोप त्यांनी केला. एनडीटीव्हीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. "जमावाने माझं घर जाळले. माझ्या पती आणि मुलाची हत्या केली. त्यानंतर माझ्या मुलीसोबत हे सर्व केले. तिला विवस्त्र करण्यात आले. तिला रस्त्यावर फिरण्यास लावले. लैंगिक हिंसाचार करण्यात आला" असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे.
पीडितेच्या आईने एनडीटीव्हीला सांगितले की, "मी सर्वात धाकटा मुलगा गमावला आहे, जी माझी एकमेव आशा होती. मला आशा होती की त्याने 12वी पूर्ण केल्यावर तो काहीतरी कामाला सुरुवात करेल. खूप कष्टानंतर मी त्याला योग्य शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवले. आता त्याचे वडीलही राहिले नाहीत. माझ्या मोठ्या मुलाला नोकरी नाही. त्यामुळे जेव्हा मी माझ्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करतो तेव्हा माझ्या मनात कोणतीही आशा उरली नाही."
3 मे रोजी मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. ठिकठिकाणी जाळपोळ आणि लुटमारीच्या घटना घडल्या. जातीय हिंसाचारात आतापर्यंत 120 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पीडित मुलीच्या आईने सांगितले की, जे काही घडले त्यानंतर गावी परतण्याचा विचारही तिच्या मनात येत नाही. "गावात परत जाण्याची शक्यता नाही. नाही... आमची घरे जळाली आहेत, आमची शेतं उद्ध्वस्त झाली आहेत. मी का परत जाऊ? माझे गाव जळून गेले आहे. मला माहित नाही माझे आणि माझ्या कुटुंबाचे काय होईल?" असंही म्हटलं आहे. एनडीटीव्ही इंडिय़ाने याबाबतचे वृत्त दिले आहे.