साडेतीन कोटींचे मोबाइल ॲक्सेसरीज जप्त, बंदरातील तस्करीवर अंकुश नाहीच
By नारायण जाधव | Published: November 19, 2022 07:30 PM2022-11-19T19:30:55+5:302022-11-19T19:31:28+5:30
आठ-दहा दिवसांपूर्वी याच बंदरात झेब्राच्या कातड्यासह प्रसिद्ध चित्रकारांची दुर्मीळ चित्रे जप्त करण्यात आली होती
नवी मुंबई : येथील जेएनपीटी बंदरातील तस्करी थांबायचे नाव घेत नसून शनिवारी सीमा शुल्क विभागाने खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तीन खेपांची तपासणी केली असता त्यात खुल्या अनब्रॅन्डेड पाकिटांमध्ये मोबाइल ॲक्सेसरीज सापडल्या. यात सॅमसंग, ॲपल, बोट, विवो, मोटोरोला एचटीसी, रिअलमी कंपनीचे बॅक पॅनल, ॲडाप्टर, एअर पॉड आढळले. या सामानाची किंमत साडेती कोटी रुपये आहे.
आठ-दहा दिवसांपूर्वी याच बंदरात झेब्राच्या कातड्यासह प्रसिद्ध चित्रकारांची दुर्मीळ चित्रे जप्त करण्यात आली होती. तत्पूर्वी नवी मुंबई आणि पंजाब पोलीस तसेच दिल्ली पोलिसांनी हजारो कोटींचे अमंली पदार्थ एका कंटेनर यार्डमधून हस्तगत केले होते. यामुळे या बंदरातील तस्करी दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.