ऑनलाईन सेलमध्ये बुक केला मोबाईल पण बॉक्स उडताच निघाला साबण 

By पूनम अपराज | Published: October 26, 2020 05:27 PM2020-10-26T17:27:43+5:302020-10-26T17:28:39+5:30

Fraud : तपासणीनंतर गाझीपूर पोलिसांनी फसवणूकीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Mobile booked on online sale but instead of mobile youth got soap form box | ऑनलाईन सेलमध्ये बुक केला मोबाईल पण बॉक्स उडताच निघाला साबण 

ऑनलाईन सेलमध्ये बुक केला मोबाईल पण बॉक्स उडताच निघाला साबण 

Next
ठळक मुद्देकेवळ सामान वितरित करणाऱ्या मुलानेच बॉक्समधून मोबाईल लंपास करून त्यात साबण टाकला असा पोलिसांचा अंदाज आहे.

सणांच्या ऑनलाईन विक्रीत एका तरुणाने चांगली ऑफर पाहिल्यानंतर मोबाईल बुक केला. चार दिवसांनंतर त्या तरुणाच्या घरी डिलिव्हरी मॅननेही मोबाइल वितरित केला आणि निघून गेला. त्या युवकाने मोबाईल बॉक्स उघडताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. बॉक्समध्ये मोबाइलऐवजी कपडे धुण्याचासाबण होता. या तरुणाने कंपनीकडे तक्रार केली तसेच पोलिसांनाही माहिती दिली. तपासणीनंतर गाझीपूर पोलिसांनी फसवणूकीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सोहन लाल कुटुंबासमवेत मयूर विहार फेज -3 मध्ये राहतो. १९ ऑक्टोबरला सोहन लाल याने नामांकित ऑनलाइन वस्तू विकणाऱ्या कंपनीकडून मोबाइल बुक करण्यात आला होता. मोबाइल बुक केल्याच्या चार दिवसानंतर डिलिव्हरी मॅन मोबाईलसह त्याच्या घरी आला. आरोपीने युवकाला वस्तू डिलेव्हर केली आणि घाईघाईने निघून गेले.


सोहनने मोबाईल बॉक्स उघडला आणि त्यात त्याला साबण दिसला. तातडीने पीडिते तरुणाने कंपनीला ऑनलाइन कळविले. यानंतर ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. तपासणीनंतर गाझीपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ सामान वितरित करणाऱ्या मुलानेच बॉक्समधून मोबाईल लंपास करून त्यात साबण टाकला असा पोलिसांचा अंदाज आहे.

Web Title: Mobile booked on online sale but instead of mobile youth got soap form box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.