रेल्वे प्रवासादरम्यान भाजपच्या दोन आमदारांचे मोबाईल चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 01:16 PM2022-09-15T13:16:03+5:302022-09-15T13:17:43+5:30

मनमाड नाशिक दरम्यान भाजपचे दोन आमदारांचे मोबाईल व वस्तू चोरीला गेल्याचे तक्रार लोहमार्ग पोलिसात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Mobile phones of two BJP MLAs stolen during train journey | रेल्वे प्रवासादरम्यान भाजपच्या दोन आमदारांचे मोबाईल चोरीला

रेल्वे प्रवासादरम्यान भाजपच्या दोन आमदारांचे मोबाईल चोरीला

googlenewsNext

- अशोक बिदरी

मनमाड ( नाशिक ) : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वे प्रशासनातर्फे सध्या सर्वच रेल्वे गाड्या रुळावर धावू लागल्या आहेत. यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये चोरांचे प्रमाण देखील वाढले आहे. मनमाड नाशिक दरम्यान भाजपचे दोन आमदारांचे मोबाईल व वस्तू चोरीला गेल्याचे तक्रार लोहमार्ग पोलिसात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे प्रवासात भाजपच्या दोन आमदारांचे मोबईल चोरीली गेल्याच्या घटना घडली. या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी व प्रवासी रेल्वे गाडीतील असल्यामुळे रेल्वे प्रवासात होणाऱ्या चोरीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पहिली घटना देवगिरी एक्स्प्रेस मध्ये घडली. या रेल्वेतून परभणीच्या आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर या प्रवास करत होते. त्यांचा मोबाईल या प्रवासात चोरीला गेला. या चोरीप्रकरणी मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसरी घटना नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये घडली. या रेल्वेतून नांदेड येथील भाजप आमदार राम पाटील रातोळीकर हे प्रवास करीत चोरट्यांनी मनमाड येथे त्यांचा व पीएचा मोबाईल लंपास केला. तर सहप्रवाशाची कॅश असलेली पर्सही चोरली. ही बाब नाशिक येथे लक्षात आली . त्यामुळे हा गुन्हा नाशिक रेल्वे पोलिसांनी दाखल केला. या चोरीप्रकरणात मालेगाव येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण , त्यांच्याकडून आमदारांचा मोबाईल मिळाला नाही. त्यांच्यासोबत असणारे पीएचा मोबाईल व सहप्रवाशांकडून चोरलेली कॅशची पर्स मात्र या चोरट्यांकडून मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Mobile phones of two BJP MLAs stolen during train journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.