मोबाईल रिचार्जचा रिफंड पडला ७७ हजार रुपयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 01:30 PM2020-07-18T13:30:05+5:302020-07-18T13:30:40+5:30

फिर्यादीने गुगल पे वरून एका मित्राचा 399 रुपयांचा रिचार्ज केला होता..

Mobile recharge refunded to Rs 77,000 | मोबाईल रिचार्जचा रिफंड पडला ७७ हजार रुपयांना

मोबाईल रिचार्जचा रिफंड पडला ७७ हजार रुपयांना

Next

पुणे : गुगल पेवरुन त्याने ३९९ रुपयांचा रिचार्ज केला होता. परंतु, रिचार्ज न झाल्याने त्याने रिफंडसाठी केलेला प्रयत्न त्याला सायबर चोरट्यांपर्यंत नेऊन सोडले व त्यांनी त्याच्या बँक खात्यातून ७७ हजार रुपये काढून घेऊन त्याला गंडा घातला.
याप्रकरणी सोमनाथ बाबुशा खंडाळे (वय २८, रा़ पर्वती दर्शन) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ ही घटना ४ जून रोजी दुपारी २ ते ३ दरम्यान घडली होती.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, खंडाळे यांनी त्यांचे मित्राचे मोबाईलवर गुगल पे द्वारे ३९९ रुपयांचा रिचार्ज केला होता.परंतु, रिचार्ज न झाल्याने त्यांनी रिफंडसाठी गुगल पे हेल्प लाईन नंबरवर कॉल केला. तो नेमका गुगल पे ऐवजी सायबर चोरट्यांनी इंटरनेटवर टाकलेला नंबर होता. समोरुन बोलणाऱ्या सायबर चोरट्याने खंडाळे यांना रिफंड मिळण्यासाठी एनि डेस्क हे अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर त्यांच्या एटीएमची डिटेल्स व ओटीपी नंबर घेऊन त्यांच्या बँक खात्याून एका पाठोपाठ ४ ट्रान्झेक्शन करुन ७७ हजार रुपये काढून घेऊन फसवणू केली.

Web Title: Mobile recharge refunded to Rs 77,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.