मोबाईल हिसकवणाऱ्या चोराला रंगेहात अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 02:24 PM2021-06-15T14:24:47+5:302021-06-15T14:25:13+5:30
crime news : रविवारी नीरज गौंड हे अंबरनाथहुन सीएसटी ट्रेन पकडून प्रवास करत होते. विठ्ठलवाडी स्टेशनमध्ये ट्रेन आली असता एका चोरट्याने डाव साधत लोकलमध्ये बसलेल्या नीरज यांच्या हातातील फोन हिसकावला व पळून जाण्याचा प्रयत्न केला.
डोंबिवली : काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीत राहणाऱ्या विद्या पाटील यांचा मोबाईल चोराशी झालेल्या झटापटीत कळवा रेल्वे स्थानक येथे लोकलखाली येऊन मृत्यू झाला होता. यानंतरही मोबाईल चोरीचे सत्र सुरूच असून विठ्ठलवाडी स्थानकात देखील प्रवाशांच्या हातातील मोबाईल खेचून पळून जाण्याचा प्रयत्न चोरट्याने केला. मात्र या चोरट्याला रंगेहात पकडण्यात आले असून ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
रविवारी नीरज गौंड हे अंबरनाथहुन सीएसटी ट्रेन पकडून प्रवास करत होते. विठ्ठलवाडी स्टेशनमध्ये ट्रेन आली असता एका चोरट्याने डाव साधत लोकलमध्ये बसलेल्या नीरज यांच्या हातातील फोन हिसकावला व पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी नीरज यांनीही फलाटावरून उतरत या चोराचा पाठलाग केला. यावेळी गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी अखेर या चोराला पकडले.
अरबाज खान असे या आरोपीच नाव असून तो विठ्ठलवाडीमधील साई नगर चाळीमध्ये राहतो. नीरज यांनी दिलेल्या तक्रारीनूसार कल्याण रेल्वे पोलिसांनी अरबाज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला आहे.