मोबाईल चोरणारी टोळी गजाआड; धुळे तालुका पोलिसांकडून कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 04:06 PM2022-02-16T16:06:00+5:302022-02-16T16:06:25+5:30

Crime News : यासंदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली होती, त्या तक्रारीची दखल घेत बारा तासाच्या आत या मोबाईल चोरणारी टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Mobile theft gang disappears; Action by Dhule taluka police! | मोबाईल चोरणारी टोळी गजाआड; धुळे तालुका पोलिसांकडून कारवाई!

मोबाईल चोरणारी टोळी गजाआड; धुळे तालुका पोलिसांकडून कारवाई!

Next

धुळे : गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील पारोळा चौफुली ते अमळनेर चौफुलीपर्यंतच्या रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास काही तरुणांचा मोबाईल लुटीचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु होता. यासंदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली होती, त्या तक्रारीची दखल घेत बारा तासाच्या आत या मोबाईल चोरणारी टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सराईत मोबाईल चोर असलेली ही टोळी अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होती, मात्र दाखल झालेल्या तक्रारीची तात्काळ धुळे तालुका पोलिसांनी दखल घेतली. संबंधित तक्रारदाराने दिलेल्या वर्णनानुसार सदर टोळीच्या शोधात तालुका पोलीस गस्त घालत असताना त्यांनी अगदी शिताफीने या सराईत मोबाईल चोरांना पकडले. 

यानंतर पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवत काही क्षणात त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचे पंधरा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. तसेच, त्यांनी याआधी किती मोबाइल चोरले याचा देखील पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहे.

Web Title: Mobile theft gang disappears; Action by Dhule taluka police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.