मोबाइल चोरास रंगेहाथ पकडले; डोंबिवली रेल्वे स्थानकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 05:43 PM2021-06-16T17:43:40+5:302021-06-16T17:45:23+5:30
Mobile Thief Caught : लोहमार्ग पोलिसांची सतर्कता
डोंबिवली: येथील रेल्वे स्थानकात बाकड्यावर झोपलेल्या अनिल मनोहर गायकवाड (41) यांच्या पँटच्या खिशातील मोबाइल मोठ्या शिताफीने काढून पळ काढणाऱ्या सोमनाथ जैस्वाल (२२) रा. कळवा या चोरास लोहमार्ग पोलिसानी रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी बुधवारी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, तक्रादार गायकवाड हे डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी फलाट क्रमांक ३/४ वर झोपलेले असताना त्यांच्या पँटच्या उजव्या खिशातील सुमारे १० हजार ५०० रुपये किमतीचा एक मोबाइल फोन काढून चोरला आणि तो रेल्वे रुळातून पळ काढत होता.
पैलवानाच्या हत्येप्रकरणी जुडो प्रशिक्षकाला बेडया; दिल्ली पोलिसांनी केली अकरावी अटक https://t.co/3Cq6ergO0l
— Lokmat (@MiLOKMAT) June 16, 2021
तेवढयात ऑनड्युटी असलेले पोलीस शिपाई आणि होमगार्ड यांनी त्या जैस्वाल चोराला रंगेहाथ पकडले. त्यानुसार त्याची झडती, चौकशी केली असता त्याने मोबाइल चोरला असल्याचे कबूल।केले, आता त्यास अटक करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे पवार म्हणाले. त्याच्याकडून मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. बुधवारी त्यास रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिसांच्या मागणीनुसार एक दिवसाची पोलीस कोठडी त्यास सुनावली आहे. त्याच्याकडून अन्य गुन्ह्यांची उकल होते का याचा तपास करणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.