Mobile Thief Gang: मुंबई-जयपूर हायवेवर 'धूम-स्टाइल' चोरी, धावत्या कंटेनरमधून 1 कोटींचे मोबाइल लंपास; लॉन्च पण झाले नव्हते!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:45 PM2022-02-17T12:45:28+5:302022-02-17T13:53:23+5:30

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून 227 5G अँड्रॉइड फोन, तीन पिस्तूल आणि 12 जिवंत गाडतुसे जप्त केली आहेत.

Mobile Thief Gang | 1 crore mobiles looted from truck on Jaipur-Mumbai highway, three accused arrested | Mobile Thief Gang: मुंबई-जयपूर हायवेवर 'धूम-स्टाइल' चोरी, धावत्या कंटेनरमधून 1 कोटींचे मोबाइल लंपास; लॉन्च पण झाले नव्हते!

Mobile Thief Gang: मुंबई-जयपूर हायवेवर 'धूम-स्टाइल' चोरी, धावत्या कंटेनरमधून 1 कोटींचे मोबाइल लंपास; लॉन्च पण झाले नव्हते!

Next

अलवर: जयपूर-मुंबई हायवेवर मोबाईल चोरीची मोठी घटना घडली आहे. धावत्या ट्रकमधून तीन दरोडेखोरांनी 1 कोटी किमतीचे 227 स्मार्टफोन चोरले. पण, अलवर जिल्ह्यातील मलाखेडा पोलिसांनाना या टोळीतील तीन जणांचा मुसक्या आवळण्यात यश आले. तसेच, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले 227 अँड्रॉइड मोबाईल फोन, तीन देशी बनावटीची पिस्तूल आणि एक डझन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

नवीन 5G फोन्सची चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीकडून जप्त केलेले सर्व मोबाईल 5G चे असून, या फोनची अद्याप मार्केटमध्ये विक्री सुरुही झालेली नाही. हे आरोपी अतिशय हुशार असून, त्यांनी धावत्या कंटेनरमधून हे मोबाईल चोरल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या पोलीस पकडलेल्या तिघांची चौकशी करत आहेत.

एक कोटींचे मोबाईल
पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, जयपूर-मुंबई महामार्गावर धावत्या कंटेनरमधून हे मोबाईल लुटले. या मोबाईलची बाजारातील किंमत 1 कोटींच्या आसपास आहे. साजिद उर्फ ​​काला(रा.दुडोली हरियाणा), अनिश आणि जब्बार(रा.जयपूर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत, तर मोहम्मद, आसिफ आणि अब्बास हे तिघे फरार झाले आहेत. सध्या पोलीस या तिघांची चौकशी करत आहेत. या चोरट्यांकडून इतर अनेक मोठ्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

असे पकडले चोरटे
एसपी गौतम यांनी सांगितल्यानुसार, मालाखेडा पोलीस ठाण्याला या टोळीतील लोक मंगळवारी रात्री आल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यावर पोलिसांनी रात्री उशिरा हळदीना चौकात वाहनांची तपासणी सुरू केली. यादरम्यान पोलिसांना अलवरच्या बाजूने एक कार येताना दिसली. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र कार चालकाने गाडी पुढे करून परत नेण्यास सुरुवात केली. त्यावर पोलिसांनी त्याला घेराव घातला आणि त्या गाडीतून तिघांसह मुद्देमाल जप्त केला.
 

Web Title: Mobile Thief Gang | 1 crore mobiles looted from truck on Jaipur-Mumbai highway, three accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.