सराईत मोबाईल चोरांची टोळी अटकेत,45 लाखाचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 03:17 PM2020-09-08T15:17:58+5:302020-09-08T15:21:06+5:30

गुन्हे शाखा पोलीसांची कारवाई 

Mobile thieves arrested by crime branch, Rs 45 lakh seized | सराईत मोबाईल चोरांची टोळी अटकेत,45 लाखाचा मुद्देमाल जप्त

सराईत मोबाईल चोरांची टोळी अटकेत,45 लाखाचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देचोरी केलेले मोबाईल परराज्यात मागणी नुसार पाठवले जाणार होते.  या टोळीचे राज्याबाहेर चोरीचे मोबाईल खरेदी करणाऱ्यांसोबत संपर्क आहेत.

नवी मुंबईत : खारघर येथील मोबाईल शॉपमध्ये घरफोडी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून 45 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरी केलेले मोबाईल परराज्यात मागणी नुसार पाठवले जाणार होते. 

खारघर येथे मोबाईल शॉप फोडल्याचा गुन्हा 30 ऑगस्टला घडला होता. गॅस कटरने शटर कापून दुकान लुटण्यात आले होते. तर गुन्ह्यानंतर त्याठिकाणच्या सीसीटीव्हीच्या डीव्हीआर देखील चोरण्यात आला होता. यामुळे गुन्हेगारांची माहिती पोलिसांना कळू शकलेली नव्हती. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुशंघाने खारघर पोलीस व गुन्हे शाखा पोलीस तपास करत होते. या गुन्ह्यात 50 लाखाच्या जवळपास किमतीचे मोबाईल चोरीला गेले होते. त्यानुसार गुन्हे शाखा प्रभारी उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, राजेश गज्जल, निलेश तांबे, संजय पवार, पोपट पावरा, विष्णू पवार, सचिन घनवटे, विजय पाटील आदींचे पथक तयार करण्यात आले होते.
या पथकाकडून घरफोडीच्या गुन्ह्यात सक्रिय असणाऱ्या गुन्हेगारांची माहिती मिळवली जात होती. . 
यादरम्यान गॅस कटरने शटर कापून घरफोडी झाल्याच्या कुर्ला मधील एका गुन्ह्याचा आढावा वरिष्ठ निरीक्षक कोल्हटकर यांनी घेतला. यावेळी समोर आलेल्या माहितीच्या आधारे काही संशयितांची नावे समोर आली. त्याआधारे मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून तिघांना अटक करण्यात आली. शफिकउल्ला उर्फ सोनू अतिकउल्ला (24), अयान उर्फ निसार उर्फ बिट्टू रफी अहमद शेख (28) व इम्रान मोहम्मद उर्फ इम्मू बिंदू अन्सारी (25) अशी त्यांची नावे आहेत. शफिकउल्ला हा टोळीचा म्होरक्या असून तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून 45 लाख रुपयांचे चोरीचे मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी त्यांनी कुर्ला येथून एक कार चोरली होती. याच कारमधून गॅसकटर घेऊन ते खारघर येथे आले होते अशी माहिती पोलीस आयुक्त  बिपिनकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सह आयुक्त जय जाधव, उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त विनोद चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर आदी उपस्थित होते. 


या टोळीचे राज्याबाहेर चोरीचे मोबाईल खरेदी करणाऱ्यांसोबत संपर्क आहेत. त्यांना ज्या प्रकारच्या मोबाईल अथवा टॅबची मागणी असेल त्या प्रकारे ते घरफोडी करायचे. त्यानुसार या गुन्ह्यात इतरही अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यानुसार गुन्हे शाखा पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत

 

 

Web Title: Mobile thieves arrested by crime branch, Rs 45 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.