लोकलमध्ये मोबाइल चोरट्या तरूणीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 21:21 IST2019-04-01T21:18:33+5:302019-04-01T21:21:01+5:30
गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तिला पकडले.

लोकलमध्ये मोबाइल चोरट्या तरूणीस अटक
मुंबई - लोकलच्या डब्यात प्रवाशांचे खिसेे कापणाऱ्या एका तरुणीस मुंबईच्या रेल्वेपोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अफरिन शेख (२५) असं या तरुणीचे नाव असून ती गोवंडीची राहणारी आहे. अफरिन ऐरोली येथे कामाला आहे. कामाला जाण्यासाठी ती कुर्ला ते ठाणे आणि ठाण्याहून ऐरोली असा प्रवास करायची. २८ मार्च रोजी ती नेहमीप्रमाणे लोकलमधून प्रवास करायची. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अफरिनने तरुणीच्या खिशातला मोबाइल चोरला. मात्र मोबाइल खिशातून काढल्याची जाणीव होताच तरूणीने अफरिनला पकडले. त्यावेेेळी अफरिन तरूणीस धक्का देऊन पळू लागली.दरम्यान, तरुणीने तिचा पाठलाग करत आरडाओरडा केला. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तिला पकडले.
अफरिनवर या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात ती १५ दिवसांपूर्वीच एका गुन्ह्यातून जामीनावर सुटून ती जेलबाहेर आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्यावर या पूर्वीही चार गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.