Aryan Khan Drugs Case: आर्यन खानच्या सुटकेवेळी पाकिटमारांचा हैदोस, आर्थर रोड तुरुंगाबाहेरील गर्दीत १० मोबाईल चोरले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 10:56 AM2021-11-01T10:56:58+5:302021-11-01T10:58:25+5:30

Aryan Khan Drugs Case: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Sharukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज पार्टी प्रकरणातील खटल्यात जामीन मिळाला आणि त्याची मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून मुक्तता झाली.

mobile thieves had field day today at arthur road jail atleast 10 mobiles stolen since yesterday | Aryan Khan Drugs Case: आर्यन खानच्या सुटकेवेळी पाकिटमारांचा हैदोस, आर्थर रोड तुरुंगाबाहेरील गर्दीत १० मोबाईल चोरले

Aryan Khan Drugs Case: आर्यन खानच्या सुटकेवेळी पाकिटमारांचा हैदोस, आर्थर रोड तुरुंगाबाहेरील गर्दीत १० मोबाईल चोरले

Next

Aryan Khan Drugs Case: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा (Sharukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज पार्टी प्रकरणातील खटल्यात जामीन मिळाला आणि त्याची मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून मुक्तता झाली. आर्यन खान याला पाहण्यासाठी तुरुंगाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती आणि याच गर्दीचा फायदा घेत पाकिटमारांची चांदी झाल्याची माहिती समोर आली आहे. कारण शुक्रवारपासून ते आजपर्यंत जवळपास १० जणांनी त्यांचे मोबाईल या गर्दीत चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. 

मुंबईतील समुद्रात क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान याला एनसीबीनं अटक केली होती. आर्थर रोड तुरुंगात आर्यनला ठेवण्यात आलं होतं. शुक्रवारी आर्यन खानची तुरुंगातून मुक्तता झाली आणि त्याला घेण्यासाठी शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी पोहोचला होता. आर्यन आता 'मन्नत'वर आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी 'मन्नत' बाहेर ढोल-ताशे वाजवत आर्यन खानचं स्वागत केलं. पण आर्यन खानच्या सुटकेवेळी तुरुंगाबाहेर जमलेल्या गर्दीत पाकिटमारांनी हातसफाई केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी मोबाइल चोरीच्या घटनेची दखल घेतली असून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

Read in English

Web Title: mobile thieves had field day today at arthur road jail atleast 10 mobiles stolen since yesterday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.