मोबाइल, घड्याळ चोरणारी दुकली गजाआड, ७४ मोबाइल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 02:27 AM2020-07-08T02:27:39+5:302020-07-08T02:27:54+5:30
तब्बल ५ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या दुकलीला रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या तर एकाचा शोध सुरू आहे.
मुंबई : वडाळा येथील मोबाइल दुकानाचे शटर तोडून मोबाइल, ब्ल्युटूथ आणि घड्याळे अशा तब्बल ५ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या दुकलीला रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या तर एकाचा शोध सुरू आहे.
वडाळा रेल्वे स्थानक परिसरात कुटुंबासोबत राहात असलेल्या कृष्णा जयस्वाल यांचे तेथेच मोबाइलचे दुकान आहे. २८ जूनच्या सायंकाळी दुकान बंद करून ते घरी गेले. दुसºया दिवशी सकाळी दुकानाचे शटर उघडे असल्याचे त्यांना दिसले. चोराने दुकानाचे शटर तोडून आतील वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल, ब्ल्युटूथ आणि घड्याळे अशा एकूण ५ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला होता. जयस्वाल यांनी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेजनुसार यात तिघांनी चोरी केल्याचे समोर आले. शिवडी परिसरात नाकाबंदी सुरू असताना एक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचे नाव मोनू उस्मान खान असल्याचे समोर आले. त्याच्या चौकशीतून दुसरा आरोपी मुबारक शेख पथकाच्या हाती लागला. त्याच्याकडून ४७ मोबाइल जप्त करण्यात आले. अन्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.