मोहाली MMS कांड: आरोपी तरुणीने आपलेच व्हिडीओ बॉयफ्रेंडला पाठविले; चंदीगढ विद्यापीठाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 04:55 PM2022-09-18T16:55:40+5:302022-09-18T16:56:07+5:30
पंजाबच्या मोहालीमध्ये एका महाविद्यालयात रात्री उशिरा गदारोळ माजला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीनं आपल्या मैत्रिणींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते इंटरनेटवर व्हायरल केले.
मोहालीतील एमएमएस प्रकरणामुळे पंजाब हादरला आहे. साठ मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ लीक केल्याने आठ विद्यार्थीनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणि विद्यापीठाने केलेल्या प्राथमिक तपासात काही वेगळेच समोर येत आहे. यामुळे आता पोलीस आणि विद्यापीठ या प्रकरणात काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप होत आहेत.
पंजाबच्या मोहालीमध्ये एका महाविद्यालयात रात्री उशिरा गदारोळ माजला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीनं आपल्या मैत्रिणींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते इंटरनेटवर व्हायरल केले. हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर हॉस्टेलच्या ८ विद्यार्थीनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविद्यालयाच्या गेट नंबर २ वर पीडित विद्यार्थीनींनी निदर्शनं केली आणि कारवाईची मागणी केली. पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांकडून योग्य त्या कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर पीडित विद्यार्थीनी शांत झाल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या ८ विद्यार्थीनींपैकी एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर आहे.
पंजाब पोलिसांनी याची चौकशी सुरु केली असून यात आरोपी तरुणीने आपलेच व्हिडीओ रेकॉर्ड करून तिच्या शिमल्यात राहणाऱ्या बॉयफ्रेंडला पाठविल्याचे समोर येत आहे. हा दावा विद्यापीठ आणि पोलिसांनी केला आहे. आरोपी विद्यार्थीनीच्या मोबाईलमध्ये फक्त तिचेच अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. विद्यार्थिनी स्वतःचे न्यूड व्हिडिओ बनवायची आणि ती तिच्या बॉयफ्रेंडला पाठवायची. याशिवाय तिने इतर कोणत्याही मुलीचा व्हिडिओ बनवला नाही, असा दावा विद्यापीठाने केला आहे.
पोलिसांनी विद्यार्थिनीचा मोबाईल, तिची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. तसेच एकाही मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही असा दावा विद्यापीठाचे कुलगुरू आरएस बावा यांनी म्हटले आहे. सात मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या अफवा आहेत. कोणत्याही मुलीने असे कोणतेही पाऊल उचलले नाही. या घटनेत एकाही मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
८ विद्यार्थीनींनी केला आत्महत्येचा प्रयत्न
विद्यापीठातील ६० विद्यार्थीनींचा एमएमएस बनवून इंटरनेटवर अपलोड करण्यात आला होता. जेव्हा विद्यार्थींनीपर्यंत त्यांचे व्हिडिओ पोहोचले तेव्हा त्यांना हे असं कसं घडलं याबाबत काहीच कळेना. या घटनेमुळे वसतीगृहातील ८ विद्यार्थींनीनी आपलं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला. यातील एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर सात विद्यार्थीनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.