मोहाली MMS कांड: तरुणीच्या मोबाईलमध्ये आणखी १५ व्हिडीओ सापडले; प्रकरण बॉयफ्रेंडपर्यंतच मर्यादित नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:35 PM2022-09-20T23:35:28+5:302022-09-20T23:36:02+5:30
chandigarh mms video Leak: एसआयटीने फॉरेन्सिक टीमसह मंगळवारी आरोपींच्या चौकशीसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी मुलींच्या वसतिगृहातील बाथरूमची तपासणी करण्यात आली.
चंदीगढच्या खासगी विद्यापीठामध्ये एका तरुणीने तिच्या हॉस्टेलमधील साठहून अधिक विद्यार्थीनींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ बनविल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पहिल्या दिवशी विद्यापीठ आणि पोलिसांनी तिच्या मोबाईलमध्ये असले व्हिडीओ नसल्याचा दावा केला होता. तो आज फोल ठरला आहे. तरुणीच्या मोबाईलमध्ये १५ हून अधिक अश्लिल व्हिडीओ सापडल्याने खळबळ उडाली आहे.
या व्हिडीओंमध्ये कोणत्याही विद्यार्थीनीचा चेहरा दिसत नसून कंबरेपासून खालचा भाग दिसत आहे. यामुळे या विद्यार्थीनी कोण आहेत, हे ओळखता येणे कठीण आहे. आसआयटीने तरुणीचा ताबा घेतला असून हे व्हिडीओ कोणाचे आहेत, याचा शोध घेतला जात आहे. मंगळवारी एसआयटीने आरोपींची साडे सहा तास चौकशी केली. यावेळी त्य़ांना ५० हून अधिक प्रश्न विचारण्यात आले.
पंजाब पोलिसांनी आणखी दोन तरुणांना अटक केली असून हे व्हिडीओ प्रकरण आता आरोपी तरुणीच्या बॉयफ्रेंडपर्यंतच मर्यादित नसल्याचे समोर येत आहे. यात अनेक खुलासे होत आहेत. परदेशातील काही मोबाईल नंबरची देखील चौकशी केला जाणार आहे.
रुपनगरचे डीआयजी गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणाच्या तपासात आरोपींचे मोबाईल सर्वात महत्त्वाचे आहेत. तिन्ही आरोपींचे फोन तपासण्यासाठी सायबर सेल पाठवण्यात आले आहेत. इतर मुलींचे व्हिडिओ बनविण्यात आल्याची शक्यता आहे. सध्या यामागे काही मोठे षडयंत्र आहे का, याचा शोध पथक घेत आहे.
एसआयटीने फॉरेन्सिक टीमसह मंगळवारी आरोपींच्या चौकशीसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी मुलींच्या वसतिगृहातील बाथरूमची तपासणी करण्यात आली. वसतिगृहाच्या वॉर्डनलाही एसआयटीने पाचारण केले होते. त्यांचे जबाबही घेण्यात आले आहेत. व्हिडीओ लीक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास कधी आले आणि हा सगळा प्रकार कसा घडला हे जाणून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात आला.
काहीतरी मोठे हाती लागणार...
तरुणीवर व्हिडिओ बनवण्यासाठी दबाव का आणला जात होता. हे व्हिडिओ पुढे कोणाला पाठविण्यात आले? ते लोक कोणकोण आणि कुठे आहेत? जर काहीच नव्हते तर चॅट आणि व्हिडिओ डिलीट का केले गेले? इतर नंबरवरही व्हिडिओ शेअर केले आहेत का? याचा शोध एसआयटी घेत आहे. यामुळे काहीतरी मोठी गोष्ट हाती लागण्याची शक्यता आहे.