ज्येष्ठ नागरिकाकडून महिला डॉक्टरचा विनयभंग, नंतर मॉलमधून उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 09:25 PM2018-08-06T21:25:33+5:302018-08-06T21:26:05+5:30

गोरेगाव पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाविरोधात विनयभंग आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला

Molestation of a lady doctor from a senior citizen, then suicide by jumping from the mall | ज्येष्ठ नागरिकाकडून महिला डॉक्टरचा विनयभंग, नंतर मॉलमधून उडी मारून आत्महत्या

ज्येष्ठ नागरिकाकडून महिला डॉक्टरचा विनयभंग, नंतर मॉलमधून उडी मारून आत्महत्या

Next

मुंबई - गोरेगाव येथील आपल्याच इमारतीत राहणाऱ्या ३५ वर्षीय महिला डॉक्टरचा पाठलाग करून  घरात जबरदस्तीने शिरुन विनयभंग केला. तसेच हातोड्याने महिलेवर हल्ला करणाऱ्या ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने रविवारी सकाळी मालाडमधील इनॉर्बिट मॉलमधील दुसऱ्या मजल्यावरून उडी घेउन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत गोरेगाव पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाविरोधात विनयभंग आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे स्पष्ट केले. तर बांगूर नगर पोलीस ठाण्यात आत्महत्येबाबत अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिरीन अँलेन असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.   

सहा महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या या ज्येष्ठ नागरिकाने आठवड्यापासून ३५ वर्षीय महिला डॉक्टरचा पाठलाग करत होता.  हा ज्येष्ठ नागरिक डॉक्टरने पाठलाग करणारा ज्येष्ठ नागरिक गोरेगाव येथील इमारतीतील लिफ्टपर्यंत येऊन  बोलण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली आहे. काल (रविवारी) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पीडित महिला डॉक्टर बाहेरून आली असता, तिच्यावर पळत ठेवून तिचा मागे मागे आला. नंतर लिफ्टमध्ये तिच्यासोबत प्रवेश केला. या महिला डॉक्टरांची आई घराबाहेर पडल्याची संधी साधून ज्येष्ठ नागरिकाने त्यांच्या घरात जबरस्तीने प्रवेश करून हल्ला केला. मात्र, ज्येष्ठ नागरिकाने पीडित महिलेकडून  पोलिसात  तक्रार न करण्याबाबत पत्र लिहून घेतले. त्यानंतर महिला डॉक्टरने गोरेगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. नंतर होणाऱ्या बदनामीला घाबरून या ज्येष्ठ नागरिकाने  दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास या डॉक्टर महिलेवर उपचार सुरू असतानाच ज्येष्ठ नागरिकाने मॉलमधील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. बांगूर नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन जखमी अवस्थेतील ज्येष्ठ नागरिकास जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले असता तिथे त्यास दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. सुसाईट नोट घटनास्थळी सापडलेली नाही. बांगूर नगर पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. 

Web Title: Molestation of a lady doctor from a senior citizen, then suicide by jumping from the mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.