विवाहित शिक्षिकेचा विनयभंग; गाडी भाड्याने करणे पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 22:07 IST2021-03-23T22:07:08+5:302021-03-23T22:07:45+5:30
Molestation : पोलिसांनी तक्रार मिळताच आरोपी समीर काकडे याच्याविरोधात भादवी ३५३(अ),३५४(ड) २९४,५०६ अन्तर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.पुढील तपास ठानेदार जगदिश मंडलवार करीत आहे.

विवाहित शिक्षिकेचा विनयभंग; गाडी भाड्याने करणे पडले महागात
मारेगाव(यवतमाळ) एका तरुणाची फोर व्हीलर गाडी भाडयाने नेणे एका शिक्षिकेला महागात पडली. गाडी भाड्याने घेतल्याने झालेल्या ओळखीतून एका २६ वर्षीय वाहन चालकाने विवाहित शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी मारेगाव शहरात घडली.
एका खाजगी शाळेत शिक्षिका असलेल्या या शिक्षिकेने आरोपी समीर काकडे (वय २६ वर्ष रा.गोंडबुरांडा) यांची इन्डिका गाडी भाड्याने नेली होती. यातून ओळख झाल्याने आरोपी सदर विवाहितेला विविध कारणाने भेटून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यापासून करीत होता. काही दिवसांपूर्वी सदर शिक्षिका शाळेत जात असताना आरोपीने पिडित शिक्षिकेला रस्त्यात अडवून मोबाइल नंबरची व शरीर सुखाची मागणी केली. नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.सदर शिक्षिका घडलेल्या प्रकाराने घाबरुन गेली. तिने घडलेल्या घटनेची माहिती वडील व भावाला सांगितली. आज पिडितेसह वडील व भावाने मारेगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार मिळताच आरोपी समीर काकडे याच्याविरोधात भादवी ३५३(अ),३५४(ड) २९४,५०६ अन्तर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.पुढील तपास ठानेदार जगदिश मंडलवार करीत आहे.