बदलीच्या कामासाठी महिलेचा विनयभंग; राज्य कर उपायुक्ताविरोधात गुन्हा दाखल

By सदानंद सिरसाट | Published: December 20, 2023 12:13 AM2023-12-20T00:13:32+5:302023-12-20T00:13:39+5:30

महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा

molestation of women for exchange work; A case has been filed against the Deputy Commissioner of State Tax | बदलीच्या कामासाठी महिलेचा विनयभंग; राज्य कर उपायुक्ताविरोधात गुन्हा दाखल

बदलीच्या कामासाठी महिलेचा विनयभंग; राज्य कर उपायुक्ताविरोधात गुन्हा दाखल

(सदानंद सिरसाट : खामगाव) जि.बुलढाणा: खामगाव येथील वस्तू व सेवाकर कार्यालयात झालेली बदली गैरसोयीची ठरत असल्याने त्याऐवजी सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्ती मिळण्याच्या प्रस्तावाला शिफारस पत्र देण्यासाठी येथील राज्य कर उपायुक्ताने महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या तक्रारीवरून अमरावती येथील गाडगेनगर पाेलिस ठाण्यात अखेर १४ डिसेंबर २०२३ रोजी विनयभंगासह ॲट्राॅसिटीअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार त्या महिला कर्मचाऱ्याची आधीच्या ठिकाणावरून खामगाव येथे बदली झाली होती. मात्र, वैद्यकीय कारणास्तव खामगाव हे ठिकाण गैरसोयीचे असल्याने त्याठिकाणाऐवजी सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्ती मिळण्यासाठीचा अर्ज नागपूर येथील वस्तू व सेवाकर विभागाच्या अपर राज्य कर आयुक्तांकडे केला. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याने खामगाव येथील अधिकाऱ्याची शिफारस असेल तर प्रतिनियुक्ती देता येईल, असे सांगितले. त्यानुसार पीडितेने खामगाव येथील राज्य कर उपायुक्त मारोतराव राठोड यांना प्रतिनियुक्तीसाठी शिफारस पत्र देण्याची विनंती केली. त्याचा गैरफायदा घेत आरोपी अधिकाऱ्याने पीडितेला द्वैअर्थी बोलण्यासोबतच व्हाॅट्सॲपद्वारे शरीरसुखाची मागणी करणारे मेसेज पाठविले.

हा प्रकार १८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत म्हटले, तसेच विविध संभाषणांमध्ये त्यांनी पीडितेचा विनयभंग केल्याचे स्क्रीनशाॅट, रेकाॅर्डिंगचे पुरावे तक्रारीसोबत देण्यात आले. त्यावरून अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिसांनी आरोपी राज्यकर उपायुक्त मारोतराव राठोड यांच्यावर भादंविच्या कलम ३५४ अ, ३५४ ड, ५०९, तसेच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (१), डब्ल्यू-२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास अमरावती पोलिस करीत आहेत.

Web Title: molestation of women for exchange work; A case has been filed against the Deputy Commissioner of State Tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.