‘तु चीज बडी है मस्त मस्त’ गाणे लावत विनयभंग, सहाय्यक डॉक्टरावर गुन्हा दाखल
By रूपेश हेळवे | Published: March 9, 2023 04:45 PM2023-03-09T16:45:56+5:302023-03-09T18:23:15+5:30
पीडित डॉक्टरच्या फिर्यादीवरून डॉ. फारूख ईलाही बागवान याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर : सहकारी डॉक्टराला वाईट नजरेने पाहत तिला उद्देशून तिला ऐकू जाईल, असे ‘तु चीज बडी है मस्त मस्त’ हे गाणे मोबाईलवर लावत तिला मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी एका डॉक्टरावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित डॉक्टरच्या फिर्यादीवरून डॉ. फारूख ईलाही बागवान याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित डॉक्टर ही एका हॉस्पिटलमध्ये सेवा बजावत आहे. तेथेच आरोपी डॉ. फारूक बागवान हा ही कामास आहे. आरोपी बागवान हा पीडित डॉक्टरकडे मागील अनेक दिवसांपासून वाईट नजरेने पाहत होता. ६ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित डॉक्टराला पाहून आरोपी बागवान याने तिला ऐकू येईल या उद्देशाने चित्रपटातील ‘तु चीज बडी है मस्त मस्त’ हे गाणे चालू केले. शिवाय त्यांच्या खांद्याला स्पर्श केला. यावेळी पीडितेने झिटकारत आरडा ओरड सुरू केली. याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी बागवान याला विचारल्यानंतर त्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडितेने घडलेला प्रकार वरिष्ठांच्या समोर मांडला. त्यानंतर बुधवारी रात्री आरोपी डॉ. फारूख बागवान याच्यावर जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.