वांद्रे येथे लिफ्टमध्ये घुसून महिलेचा विनयभंग; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 13:08 IST2019-02-21T13:06:05+5:302019-02-21T13:08:56+5:30
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांद्रे येथे लिफ्टमध्ये घुसून महिलेचा विनयभंग; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
मुंबई - वांद्रे पश्चिम येथे एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.
तक्रारदार महिला ही वांद्रे पश्चिम येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहते. ही महिला मैत्रिणीसोबत सिनेमा पाहण्याकरिता गेली होती. चित्रपट पाहून आल्यावर ती रिक्षाने घरी आली. ती इमारतीच्या लिफ्टमध्ये शिरली तेव्हा चेहऱ्याला रुमाल बांधलेला एक अज्ञात इसम लिफ्टमध्ये घुसला. त्याला महिलेने कितव्या मजल्यावर जाणार याबाबत विचारले. मात्र ती व्यक्ती गप्प उभी राहिली. लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर पोहचल्यावर फरार आरोपीने महिलेचा विनयभंग केला. महिलेने त्याच्या चेहऱ्यावरील रुमाल काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तेथून पळ काढला.