आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:07 PM2019-03-18T18:07:53+5:302019-03-18T18:14:26+5:30
हिंजवडी आयटी पार्क मधील कंपनीच्या प्रिंटर रूममध्ये बोलावून महिला कर्मचाचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क मधील कंपनीच्या प्रिंटर रूममध्ये बोलावून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषी मुगराय (४२, रा. ५०३ सी विंग, एनडीए रोड, कोंढवे धावडे, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि ऋषी हे दोघे एकाच कंपनीत कामाला असताना त्याने काम असल्याचे सांगून पीडित तरूणीला प्रिंटर रूममध्ये बोलावून घेतले. तिथे तिच्यासोबत अश्लील चाळे केले. हा प्रकार पीडित महिलेने तिच्या पतीला सांगितला होता. तसेच २०१६ मध्ये पुन्हा पीडित महिलेला काही कारणाने प्रिंटर रूममध्ये बोलावून घेतले आणि तेथे ऋषी याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक गोविंद पवार करत आहेत.