‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 07:24 PM2020-09-12T19:24:26+5:302020-09-12T19:25:08+5:30
मोटारीत सापडलेल्या लॅपटॉपमध्ये ‘त्याने’ लिहिले टोकाच्या निर्णयाचे कारण
पणजी : घरातील वाद आणि दबाव तसेच पत्नी व पालकांमधील बेबनाव यांमुळेच गोवा विद्यापीठाचे साहाय्यक प्राध्यापक विशाल च्यारी यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे आता दिसून आले आहे. दहा सप्टेंबरला पर्वत पारोडा या भागातील जंगलात प्रा. च्यारी यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. २९ आॅगस्ट रोजी ते घरातून अचानक गायब झाले होते.
प्रा. च्यारी यांची मोटार चंद्रेश्वर पर्वताच्या पायथ्याशी केपे पोलिसांना सापडली होती. या मोटारीत पोलिसांना त्यांचा लॅपटॉप सापडला. त्यात वरील मृत्यूपूर्व पत्र वाचायला मिळाले होते. परंतु असा मजकूर लिहिलेला माणूस टोकाचे पाऊल उचलतोच असे नाही. त्यामुळे पोलिसांनी तो मजकूर गुलदस्त्यातच ठेवला होता.
प्रा. विशाल च्यारी यांची पत्नी व कुटुंबीयांबरोबरच्या तेढामुळे प्रचंड कुचंबणा होत होती. विजातीय विवाह तसेच
इतर कौटुंबिक ताणतणाव यामुळे ते आयुष्यालाच कंटाळले होते. निकटवर्तीय सांगतात, प्रा. च्यारी हे अत्यंत सौजन्यशील, सौम्य स्वभावाचे होते. आपले काम बरे आणि आपण बरे, या प्रवृत्तीचा हा शिक्षक जीवनातील हा तणाव सहन करू शकला नाही आणि त्याने ही कुत्तरओढ एकदाची संपविण्याचा निर्णय घेतला.
प्रा. च्यारी यांची पत्नीही उच्चशिक्षित असून तिलाही स्वतंत्रपणे संसार करण्याची ओढ होती. परंतु प्रा. च्यारी आपल्या आई वडिलांना सोडून वेगळे राहू इच्छित नव्हते. आपल्या आई-वडिलांमुळेच मी शिक्षण घेऊ शकलो, चांगले जीवन त्यांच्यामुळेच माझ्या वाट्याला आले, त्यांना मी कसे अंतर देऊ शकतो? ... ‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेत आहे. तुम्हाला सोडून जात आहे तेव्हा मला माफ कर गं..’’ असे भावोत्कट शब्दांतील हे मृत्यूपूर्वपत्र लॅपटॉपमध्ये टाईप करून ठेवले आहे. पत्नी व आई-वडील यांच्या मतभेदांचे प्रसंग अनेक कुटुंबांत येतात. प्रा. विशाल च्यारी यांचा तर प्रेमविवाह झाला होता. तेव्हा एक तर वेगळे राहणे किंवा घटस्फोट घेऊन या तणावातून कायमचे दूर होणे असे दोन पर्याय त्यांच्याकडे होते. परंतु सुशिक्षित तरुणाने अशा पद्धतीने जीवन संपवावे हे काही लोकांना रुचलेले नाही. त्यामुळे एका बाजूला या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत असतानाच विद्यापीठातील प्राध्यापक खेद व्यक्त करताना गुरुवारी दिसले. गुरुवारी त्यांच्यासाठी विद्यापीठाने शोकसभा आयोजित केली होती.
प्रा. विशाल च्यारी यांनी लॅपटॉपमधील मृत्यूपूर्व पत्रात आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असली तरी पत्नीला दोष दिलेला नाही. वास्तविक या पत्रात ते कोणालाही दोष देत नाहीत.
मृत्यूपूर्व पत्रात अत्यंत भावोत्कट शब्द..
‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेत आहे. तुम्हाला सोडून जात आहे तेव्हा मला माफ कर गं..’’ असे भावोत्कट शब्दातील आपले हे मृत्यूपूर्वपत्र प्रा. विशाल च्यारी यांनी लॅपटॉपमध्ये टाईप करून ठेवले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल
बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले
दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला
सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम
धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या
दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक