आई बनण्याच्या इच्छेपोटी महिलेने स्पर्म डोनरसोबत १० वेळा संबंध ठेवले, सत्य समजताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 10:35 PM2022-01-20T22:35:20+5:302022-01-20T22:35:34+5:30
३० वर्षीय महिलेचं याआधीच लग्न झालं आहे. तिला मुलगाही आहे. परंतु कुटुंब वाढवण्यासाठी तिने भलताच उद्योग केला
टोकियो – स्पर्म डोनरच्या मदतीनं आई बनणाऱ्या महिलेला आता तिच्या मुलाला स्वत:जवळ ठेऊ इच्छित नाही. या मुलाला कुणीतरी दत्तक घ्यावं यासाठी महिला प्रयत्न करत आहे. जपानमध्ये राहणाऱ्या या महिलेने स्पर्म डोनरवर आरोप करत त्याने त्याची ओळख लपवली होती. त्यामुळे आता मला त्याचं मुल नको अशी भूमिका घेतली आहे. स्पर्म डोनरनं महिलेशी ओळख करताना स्वत:ला जपानी आणि सिंगल असल्याचं सांगितले होते. परंतु आता महिलेला त्याचे सत्य कळालं आहे.
इडिपेंडेंट रिपोर्टनुसार, ३० वर्षीय महिलेचं याआधीच लग्न झालं आहे. तिला मुलगाही आहे. परंतु कुटुंब वाढवण्यासाठी तिने भलताच उद्योग केला. तिला पतीपासून मुलगा नको हवा होता कारण पतीच्या कुटुंबात अनुवांशिक आजार आहे. त्यासाठी ही महिला ऑनलाइन डोनरचा शोध घेत होती. जुलै २०१९ मध्ये तिचा शोध पूर्ण झाला आणि स्पर्म डोनेट करणाऱ्या चीनी व्यक्तीनं जपानी असल्याचं सांगत तिच्याशी ओळख केली. इतकचं नाही तर त्याचं लग्न झालं नाही असंही तो म्हणाला.
कृत्रिम गर्भधारणा जपानमध्ये काही प्रमाणात मर्यादित आहे. त्यासाठी या महिलेने गर्भवती होण्यासाठी डोनरसोबत १० वेळा संबंध बनवले. सर्वकाही महिलेच्या इच्छेनुसार झालं त्यानंतर महिला गर्भवती राहिली. तिने एका मुलाला जन्म दिला. परंतु जेव्हा तिला डोनरचं सत्य कळालं तेव्हापासून या महिलेने त्याच्यासोबत संबंधानंतर झालेल्या मुलाला स्वत:पासून दूर ठेवले.
या महिलेने टोकियोतील एका संस्थेकडे मुलाला दत्तक घेण्यासाठी संपर्क साधला होता. त्यासोबत स्पर्म डोनरविरुद्ध तिने कायदेशीर कारवाई सुरु केली. महिलेच्या भावना दुखावून तिची फसवणूक केल्याचा आरोप करत या महिलेने २१ कोटी रुपये भरपाई मागितली आहे. तिच्या वकिलाने पत्रकार परिषद घेत स्पर्म डोनरने फसवणूक केल्यापासून महिलेला मोठा मानसिक धक्का बसला आहे. तिची तब्येत ढासळत असल्याचं सांगितले.