पैशाचा वाद भावाशी, जीव गेला बहिणींचा, हत्याकांडप्रकरणी तीन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 10:50 AM2023-06-19T10:50:35+5:302023-06-19T10:51:02+5:30

पीडितेचा दुसरा भाऊ लाल यांनी सांगितले की, ‘माझा मोठा भाऊ ललित याने कोणालातरी कर्ज दिले होते.

Money dispute with brother, sisters lost their lives, three people arrested in connection with murder | पैशाचा वाद भावाशी, जीव गेला बहिणींचा, हत्याकांडप्रकरणी तीन जणांना अटक

पैशाचा वाद भावाशी, जीव गेला बहिणींचा, हत्याकांडप्रकरणी तीन जणांना अटक

googlenewsNext

नवी दिल्ली : भावाचा आर्थिक वाद दोन बहिणींच्या जीवावर बेतला. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. नैऋत्य दिल्लीतील ‘आरके पुरम’ भागात रविवारी पहाटे ही घटना घडली. या हत्याकांडाप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.  पिंकी (वय ३०) व ज्योती (२९) अशी या मृत बहिणींची नावे आहेत.  

पीडितेचा दुसरा भाऊ लाल यांनी सांगितले की, ‘माझा मोठा भाऊ ललित याने कोणालातरी कर्ज दिले होते. शनिवारी त्याने पैसे परत मागितले तेव्हा आरोपी व इतर काही जणांत वाद झाला. रविवारी पहाटे आम्ही झोपेत असताना काहींनी आमच्या घराचा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली.

काहीतरी अघटित घडण्याच्या भीतीने मी त्याच गल्लीत राहणाऱ्या दोन बहिणींसह नातेवाइकांना बोलावले. पण तोपर्यंत हे लोक निघून गेले होते. नंतर ते पिस्तूल घेऊन आले. ते माझ्या भावाला मारण्यासाठी आले होते. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या माझ्या दोन बहिणींवर आरोपींनी गोळ्या झाडल्या. 

Web Title: Money dispute with brother, sisters lost their lives, three people arrested in connection with murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.