एका दिवसात पैसे डबल करण्याच्या नादात गमावले 1 लाख 40 हजार; मिळाले कागदाचे तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 10:35 AM2023-09-01T10:35:22+5:302023-09-01T10:48:36+5:30

एका व्यक्तीला दीड ते दोन पट पैसे परत करण्याचे आमिष दाखवून 1 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.

money double fraud scheme auraiya man lost lakh rupees up police investigating case thief | एका दिवसात पैसे डबल करण्याच्या नादात गमावले 1 लाख 40 हजार; मिळाले कागदाचे तुकडे

फोटो - आजतक

googlenewsNext

यूपीच्या औरैयामध्ये फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीला दीड ते दोन पट पैसे परत करण्याचे आमिष दाखवून 1 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. पूर्वीच्या 20 हजार रुपयांऐवजी 30 हजार रुपये देण्यात आले, त्यामुळेच तो फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला. मात्र नंतर त्या व्यक्तीसोबत अशी घटना घडली की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ही संपूर्ण घटना औरैया सदर कोतवाली परिसरात घडली आहे. जिथे दीडपट पैसे कमवण्याच्या लोभापायी एका व्यक्तीने एक लाखाहून अधिक रुपये गमावले. मात्र, त्या व्यक्तीने पहिल्या तक्रारीत पोलिसांना संपूर्ण गोष्ट सांगितली नाही. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असता धक्कादायक खुलासा झाला. 29 ऑगस्ट रोजी सतेंद्र राव नावाच्या व्यक्तीने आपल्यासोबत घडलेल्या दरोड्याची घटना पोलिसांना सांगितली होती. तो कानपूर देहाटचा रहिवासी आहे. 

कारमधील काही लोकांनी त्याच्याकडून 1 लाख 40 हजार रुपये हिसकावून पळ काढल्याचे त्याने सांगितले. घटनेची माहिती मिळताच औरैया पोलीस सक्रिय झाले आणि घटनास्थळी दाखल झाले. सतेंद्रची 15 दिवसांपूर्वी एका ढाब्यावर चोरट्यांची ओळख झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. घोटाळेबाजांनी त्याला बनावट योजनेत पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवले. या अंतर्गत त्याला 20 हजारांऐवजी 30 हजार रुपये मिळणार होते आणि तसाच प्रकार घडला. त्याला अडकवण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांनी पहिल्याच प्रयत्नात दीडपट पैसे परत केले. यामुळे सतेंद्रला पटले आणि अधिक पैसे मिळावेत म्हणून त्याने मोठी रक्कम देण्याचे मान्य केले.

29 रोजी सतेंद्र 1 लाख 40 हजार रुपये घेऊन घोटाळे करणाऱ्यांकडे पोहोचला असता त्यांनी त्याला पूर्वीप्रमाणेच एक पाकीट दिले. यातही पैसे असतील असे सतेंद्रला वाटले मात्र यावेळी त्याची फसवणूक झाली. त्याने पाकीट घेऊन काही अंतरावर जाऊन ते उघडले असता त्यात फक्त कागदाचे तुकडे होते. हे पाहून सतेंद्रला धक्काच बसला. त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि काही लोकांनी त्याचे पैसे लुटले आणि पळून गेल्याचे सांगितले. मात्र प्रकरण फसवणुकीचे होते.

सतेंद्रच्या म्हणण्यानुसार- कानपूर देहाटमधील कांचन ढाब्याजवळ मला काही लोक भेटले. संभाषणादरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही त्यांना दिलेले पैसे दीडपट परत करू. आमच्याकडे अशी योजना आहे. त्याच्या म्हणण्यावर आल्यानंतर मी 20 हजार रुपये दिले. काही वेळाने त्यांनी सीलबंद पाकिट दिले. तो उघडला असता 30 हजार रुपये बाहेर आले. मग त्या लोकांशी मोबाईलवर बोलणे सुरू झाले. यावेळी त्यांनी 2 लाखांऐवजी 3 लाख रुपये देण्याचे सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: money double fraud scheme auraiya man lost lakh rupees up police investigating case thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.