मोलकरणीने मारला २० लाखांचा डल्ला; तब्बल १२ वर्षांपासून रोज चोरले पैसे, दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 03:03 AM2018-09-02T03:03:41+5:302018-09-02T03:04:13+5:30

घरकाम करताकरता घरातील पैसे, चांदीच्या वस्तू आदी २० लाखांची चोरी घरकाम करणाऱ्या महिलेने केल्याचा खळबळजनक प्रकार नवघर पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

Money stolen daily for 12 years, jewelery | मोलकरणीने मारला २० लाखांचा डल्ला; तब्बल १२ वर्षांपासून रोज चोरले पैसे, दागिने

मोलकरणीने मारला २० लाखांचा डल्ला; तब्बल १२ वर्षांपासून रोज चोरले पैसे, दागिने

Next

मीरा रोड : घरकाम करताकरता घरातील पैसे, चांदीच्या वस्तू आदी २० लाखांची चोरी घरकाम करणाऱ्या महिलेने केल्याचा खळबळजनक प्रकार नवघर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. एकाच ठिकाणी काम करणाºया व १७०० रुपये पगार मिळणाºया महिलेकडून दागिने, रोख, एफडी मिळून २० लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
भार्इंदर पूर्वेच्या नवघर मार्गावरील भाईदया ही जुनी इमारत आहे. या इमारतीच्या तिसºया मजल्यावर ममता विष्णू चांगोलीवाला या राहतात. त्या गृहिणी असून पतीचा कपड्यांचा व्यवसाय आहे, तर मुलगी कॉलसेंटरमध्ये काम करते. त्यांना एका सदनिकेचे भाडेही येते. आलेले पैसे वा खरेदी केलेली चांदी हे कपाटात ठेवताना त्याची नेमकी किंमत वा संख्या नोंद करून ठेवत नसत. चांगोलीवाला यांच्या घरी १२ वर्षांपासून त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणारी अपर्णा भरत पवार (४६) ही घरकाम करत होती. शेजारीच राहणारी व इतक्या वर्षांपासून काम करणाºया अपर्णानेही चांगोलीवाला कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला होता. दरम्यान, त्यांच्या घरातून रोख व चांदीची बिस्किटे चोरीला जात होती. पण, त्यांना ते लक्षात येत नव्हते.
ममता यांनी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चांगोलीवाला कुटुंबीयांना अपर्णावर जराही संशय नव्हता. परंतु, पोलिसांनी अपर्णाची माहिती घेण्यास सुरुवात केली. वन रूम किचनमध्ये अपर्णा, तिचा पती व मुलगी तसेच दिराचे कुटुंब राहते. अपर्णाही फक्त चांगोलीवाला यांच्याच घरी काम करते.

घबाड पाहून पोलीसही झाले थक्क
घर चालवताना चणचण होत नसल्याचे व तिच्या एकूणच राहणीमानावरून दिसत नसल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिच्या घराची झडती घेतली असता तीन लाख ४७ हजार ७०० रुपयांची रक्कम व नव्याने केलेले सहा लाख किमतीचे २२ तोळे सोने सापडले.
शिवाय, बँकेत पाच लाख ३३ हजार रुपये तर फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेले सहा लाख रुपये आढळले. अपर्णाकडे मिळालेले हे घबाड पाहून चांगोलीवाला कुटुंब व पोलीसही थक्क झाले.
गुरुवारी अपर्णाला अटक केली असून ४ सप्टेंबरपर्यंत तिला पोलीस कोठडी मिळाली आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून आपण रोख व चांदी चोरत होतो. त्या पैशांतूनच सोन्याचे दागिने बनवल्याची कबुली तिने दिली आहे.

Web Title: Money stolen daily for 12 years, jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.