महापालिकेच्या दोन नगरसेवकांना भामटय़ाने घातला हजोरांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 07:43 PM2021-08-18T19:43:48+5:302021-08-18T19:45:09+5:30

Fraud Case : महासभेत उघड झाली बाब

Money of Two corporators of the Municipal Corporation duped in thane | महापालिकेच्या दोन नगरसेवकांना भामटय़ाने घातला हजोरांचा गंडा

महापालिकेच्या दोन नगरसेवकांना भामटय़ाने घातला हजोरांचा गंडा

Next
ठळक मुद्देविशेष म्हणजे अशाप्रकारची टोळीच सक्रीय असल्याची माहिती भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी दिली आहे.

ठाणे  : ठाणे  महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एमआरए करण्यासाठी डॉ. एकनाथ शिंदे यांनी एक हजार रुपये कमी केले आहेत. त्यामुळे उर्वरीत रक्कम गुगल पे करावी असे सांगत भामटय़ाने ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना हजारोंचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती बुधवारी झालेल्या महासभेत उघड झाली आहे. विशेष म्हणजे ज्या नगरसेवकांना हा गंडा घातला गेला, त्यांनीच ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारची टोळीच सक्रीय असल्याची माहिती भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी दिली आहे. या सर्व प्रकारची गंभीर दाखल घेऊन साबंधीतावर गुन्हे दखल करण्याचा निर्णय यावेळी सभागृहात घेण्यात आला.
         

ठाणे  महापालिकेच्या छत्नपती शिवाजी महाराज रु ग्णालयातील एमआरआय सेंटरमध्ये आपल्या तीन वर्षाच्या मुलीच्या एमआरआयसाठी पैसे कमी पडत असल्याचा फोन आपल्याला आला असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सभागृहात दिली. ज्या व्यक्तीने फोन केला त्या व्यक्तीकडे केवळ अडीज हजार होते. मात्न एमआरआयसाठी सहा हजार लागतील असे सबंधित व्यक्तीला सांगण्यात आले. त्यानंतर आपण स्वत: रु ग्णालयाच्या डीन शी बोलून पैसे कमी करण्यासाठी सांगण्यात सांगितले. डीन यांना सांगूनही डीनच्या केबिनमध्ये देखील त्यांना घेण्यात आले नसल्याचा आरोप भोईर यांनी यावेळी केला. मात्न एमआरआयसाठी पैसे कमी पडत असल्याचा अशाप्रकारचा फोन आपल्याला देखील आला असून आपली फसवणूक झाली असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक गुरु मुख सिंग स्यांन यांनी सभागृहात दिल्यानंतर सर्व सभागृहाच अवाक झाले. शिवसेनेच नगरसेवक सुधीर कोकाटे यांना देखील अशाच प्रकारे फोन आला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. मात्र आपण त्यात फसलो नसलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी देखील अशा प्रकारची टोळीच सक्रीय असल्याचे सभागृहात सांगितले. प्राथमिक स्वरु पात पालिकेच्या या दोन नगरसेवकांची फसवणूक झाली असली तरी इतरही नगरसेवकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असल्याने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

 अशा पध्दतीने केली पैशांची लुट
ज्या व्यक्तीने पैसे मागण्यासाठी भोईर यांना फोन केला होता त्या व्यक्तीने कळवा हॉस्पिटलमध्ये  एमआरआय करणा:या डॉक्टरचे नाव  डॉ. एकनाथ शिंदे असून त्यांनी ते एक हजार कमी करत असल्याचे सबंधित व्यक्तीने भोईर यांना सांगितले. विशेष म्हणजे नगरसेवक गुरु मुखिसंग स्यांन यांनी या सर्व प्रकारचा शोध लावल्यानंतर फसवणारी व्यक्ती नाशिकची असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार आता अशा भामटय़ाच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे महासभेत निश्चित करण्यात आले.

Web Title: Money of Two corporators of the Municipal Corporation duped in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.