मुंबईत वैद्यकीय अधिकाऱ्याकडे सापडले लाखोंचे घबाड
By मनीषा म्हात्रे | Published: March 21, 2023 07:16 PM2023-03-21T19:16:09+5:302023-03-21T19:16:42+5:30
एसीबीने भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
मुंबई : परेल येथील महात्मा गांधी स्मारक रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. गजानन तुळशीराम भगत यांच्याकडे उत्पन्नापेक्षा ५७ टक्के म्हणजेच २७ लाख रुपयांची अधिकची मालमत्ता असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीब) चौकशीतून उघड झाले आहे. याप्रकरणी एसीबीने भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तुळशीराम यांनी १ फेब्रुवारी २००८ ते ४ जुलै २०१६ या कालावधीत भ्रष्ट्राचाराच्या मार्गाने ही संपत्ती गोळा केल्याचे समोर आले. त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा ५७ टक्के म्हणजेच २७ लाख रुपयांची अधिकची मालमत्ता मिळून आली आहे. याप्रकरणी, कलम १३ (१) (ई), कलम १३(२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी तुळशीराम यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
....