सावकाराने तरुणाला जिवंत जाळले; इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 08:59 AM2021-06-25T08:59:58+5:302021-06-25T09:00:21+5:30

इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील घटना : आरोपींना अटक

The moneylender burned the young man alive; Incident at Junction in Indapur taluka pdc | सावकाराने तरुणाला जिवंत जाळले; इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील घटना

सावकाराने तरुणाला जिवंत जाळले; इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील घटना

Next

बाभूळगाव (जि. पुणे) : व्याजाने दिलेल्या पैशासाठी एका युवकाचे अपहरण करून पैशाच्या बदल्यात जमीन नावावर करून न दिल्याने सावकाराने अंगावर पेट्रोल टाकून युवकाला जिवंत जाळल्याची घटना इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे वन विभागाच्या हद्दीत घडली. हा युवक ९५ टक्के भाजल्याने त्याचा तीन दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी सावकारासह दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवनाथ हनुमंत राऊत, सोमनाथ भीमराव जळक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिवराज ऊर्फ शिवराम कांतिलाल हेगडे (२७, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्यावर सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आरोपींविरोधात त्याने फिर्यादी जबाब दिला आहे. 

७ जूनला सायंकाळी नवनाथ हा निमगाव केतकी हद्दीतील यशराज पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपींनी नवनाथच्या बंदुकीच्या धाकाने त्याचे अपहरण केले होते. तुझ्याकडे आणखी पैसे निघतात, असे म्हणून १३ दिवस त्याला एका खोलीत डांबून ठेवले. २० जून रोजी वरील आरोपींनी शिवराज ऊर्फ शिवराम हेगडे याला सकाळी ६ च्या सुमारास जंक्शन फाॅरेस्ट हद्दीत आणून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत पेटवून दिले व आरोपी पसार झाले.

या घटनेत शरीर पेटल्यानंतर फिर्यादीने जमिनीवर लोळून आग विझवली व रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने नातेवाइकांना बोलावून घेऊन इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हेगडे याच्या शरीराला जास्त भाजल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तीन दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्या दरम्यान फिर्यादीने पोलिसांना लेखी जबाब दिला आहे; परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.  

आरोपी सोमनाथ भीमराव जळक व फिर्यादी शिवराज ऊर्फ शिवराम कांतीलाल हेगडे हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. मागील काही दिवसांपूर्वी या दोघांनी मिळून सावकारीच्या पैशासाठी त्यांच्याच एका मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करून मृतदेह निमगाव केतकी येथील विहिरीत फेकून दिला होता. त्यावेळी इंदापूर पोलिसांनी दोघांनाही या गुन्ह्यात अटक करून कारागृहात टाकले होते. काही दिवसांनंतर दोघेही जामिनावर बाहेर आले होते.

Web Title: The moneylender burned the young man alive; Incident at Junction in Indapur taluka pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.