राक्षसी कृत्य! गर्भवती पत्नीच्या पोटावर बसला, गळा दाबताच ७ महिन्यांचं भ्रूण आलं बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:54 IST2025-01-22T17:53:56+5:302025-01-22T17:54:41+5:30
Man kills pregnant Wife: एका व्यक्तीने पत्नीसोबत केलेल्या राक्षसी कृत्य समोर आल्यानंतर पोलिसही हादरून गेले.

राक्षसी कृत्य! गर्भवती पत्नीच्या पोटावर बसला, गळा दाबताच ७ महिन्यांचं भ्रूण आलं बाहेर
Crime News: चारित्र्यावर संशय घेत २१ वर्षीय तरुणाने गर्भवती पत्नी अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याने पत्नीची अशा पद्धतीने हत्या केली की, तिच्या गर्भातील ७ महिन्यांचं भ्रूण बाहेर पडले. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये १६ जानेवारी रोजी ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २१ वर्षीय सचिन सत्यनारायण नावाच्या तरुणाला राचकोंडा कुशाईगुडा पोलिसांनी १६ जानेवारी रोजी पत्नी स्नेहा (वय २१ वर्ष) हिची हत्या केल्या प्रकरणी अटक केली.
आधी पोटावर बसला, नंतर गळा दाबला
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पत्नीची क्रूरपणे हत्या केली. आरोपीची पत्नी स्नेहा ही सात महिन्यांची गर्भवती होती. १६ जानेवारी रोजी स्नेहा ही घरात झोपलेली होती. त्यावेळी आरोपी घरात आला आणि स्नेहाच्या पोटावर बसला. आरोपीने जोरात पत्नीचा गळा दाबला. यात महिलेच्या पोटातील भ्रूण गर्भातून बाहेर आले. यात आरोपीची पत्नी स्नेहा आणि भ्रूणाचा मृत्यू झाला.
दोघांचीही हत्या केल्यानंतर आरोपी सचिनने गॅसचा व्हॉल्व उघडला आणि त्यांना जाळले. जेणेकरून आगीत जळून त्यांचा मृत्यू झाल्याचे वाटावं. पण, आग पसरलीच नाही आणि हे बघून तो घटनास्थळावरून पळून गेला.
इन्स्टाग्रामवर भेट, नंतर जडले प्रेम
पोलीस अधिकारी जी अंजैया यांनी सांगितले की, शेजाऱ्यांनी स्नेहा आणि भ्रूण हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बघितले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि स्नेहा यांची इन्स्टाग्रामवर भेट झाली. दोघांची ओळख वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं. स्नेहाच्या दुसऱ्या व्यक्तीशी संबंध असल्याचा संशय त्याला होता.