महिलेवर महिनाभर सामूहिक बलात्कार, भाजपा आमदारासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 09:55 PM2020-02-19T21:55:13+5:302020-02-19T21:57:52+5:30
दुसरीकडे आरोपी आमदाराने या संपूर्ण प्रकरणाला राजकीय षडयंत्र म्हणून संबोधले आणि ते म्हणाले की, जर हे आरोप खरे असतील तर तो कुटूंबाला फाशी देण्यास तयार आहे.
भदोही - उत्तर प्रदेशातील भदोही येथील भाजपाचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी यांच्यासह सात जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला वाराणसीची असून तिने काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात महिलेने आमदारासह सात जणांवर आरोप केले आहेत. दुसरीकडे आरोपी आमदाराने या संपूर्ण प्रकरणाला राजकीय षडयंत्र म्हणून संबोधले आणि ते म्हणाले की, जर हे आरोप खरे असतील तर तो कुटूंबाला फाशी देण्यास तयार आहे.
या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधीक्षक राम बदन सिंह म्हणाले की, एका महिलेने १० फेब्रुवारीला भाजपाचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी आणि त्यांचे सहकारी संदीप, सचिन, चंद्रभूषण, दीपक, प्रकाश आणि नितेश एका हॉटेलमध्ये महिनाभर आळीपाळीने बलात्कार केल्याचा आरोप केला. एकदा तर ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले गेले. भदोही पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६ (ड), ३१३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वैद्यकीय तपासणीनंतर कारवाई, सध्या अटक नाही
या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्र वर्मा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महिलेचे वक्तव्य आणि हॉटेलसह सर्व मुद्द्यांचा तपास केल्यानंतर भाजपच्या आमदारासह सात आरोपींविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायदंडाधिकाऱ्यासमोर पीडित महिलेचा जबाब नोंदवून वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे सिंह म्हणाले. आता कोणालाही अटक होणार नाही.
पीडित महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे
या महिलेचा सर्वात मोठा खळबळजनक आरोप असा केला आहे की, २०१७ च्या उत्तर प्रदेशातील सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान तिला भदोही शहरातील एका हॉटेलमध्ये दीड महिना ठेवण्यात आले होते. या दरम्यान त्याच्यावर सतत बलात्कार केला गेला. इतकेच नाही तर त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी यांनीही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. महिलेचा नवरा मरण पावला आहे.
'आरोप खरे ठरले तर कुटुंब फाशी देण्यास तयार'
त्याचवेळी भाजपचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी यांनी या संपूर्ण प्रकरणाला राजकीय षडयंत्र म्हणून संबोधले आहे. आरोपी आमदाराने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'मी या प्रकरणात कोणत्याही तपास यंत्रणेला तोंड देण्यास तयार आहे. पोलीस तपासातील आरोप खरे ठरले तर मी कुटुंबास फाशी देण्यास तयार आहे. महिलांचे संरक्षण ही माझी पहिली जबाबदारी आहे. सर्व स्त्रिया आमच्या माता आणि बहीणीसारख्याच आहेत.