अमली पदार्थविरोधी कारवाईत 15 हून अधिक जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 09:19 AM2021-08-28T09:19:45+5:302021-08-28T09:19:56+5:30

मुंबई, नवी मुंबईत चार ठिकाणी ‘एनसीबी’चे छापे : रात्री उशिरापर्यंत कारवाई 

More than 15 people arrested in anti-drug operation pdc | अमली पदार्थविरोधी कारवाईत 15 हून अधिक जणांना अटक 

अमली पदार्थविरोधी कारवाईत 15 हून अधिक जणांना अटक 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि नवी मुंबईमध्ये शुक्रवारी चार ठिकाणी छापे टाकून १५ ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. यात ३ नायजेरियन ड्रग्ज तस्करांचा समावेश आहे. एनसीबीने या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्याची माहिती मिळते आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची कारवाई सुरू होती.
एनसीबीने गेल्या आठवड्यात हार्बर लाइनवरील मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्या तस्करांवर कारवाई करत, हेरॉईन, कोकेन आणि एमडी असे १ कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. कारवाईच्या वेळी ड्रग्ज तस्करांनी केलेल्या हल्ल्यात एनसीबीच्या पथकातील पाच कर्मचारी जखमी झाले होते. एनसीबीने नायजेरियन ड्रग्ज तस्कर ओबिओरा एक्वेलार याला अटक करून पसार झालेल्या आणखी चार तस्करांचा शोध सुरू केला होता. त्यानुसार, एनसीबीने मुंबई आणि नवी मुंबईमध्ये चार ठिकाणी कारवाई केल्याची माहिती मिळते आहे.
शुक्रवारी सकाळपासून एनसीबीची कारवाई सुरू आहे. यात आतापर्यंत १५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची कारवाई सुरू होती.

दोन ठिकाणच्या कारवाईत सव्वाचार कोटींचे ड्रग्ज जप्त

nगुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) खार, धारावी व दिंडोशीत केलेल्या कारवाईतून सव्वाचार कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. यात तरुणांना कोकेन पुरविणाऱ्या नायजेरियन नागरिकालाही बेड्या ठोकल्या आहेत. इनोसेंट लोरेन्स (वय ३३) असे या नायजेरियन नागरिकाचे नाव असून तो आंतरराष्ट्रीय टोळीत सक्रिय आहे. एएनसीच्या वांद्रे कक्षाने खारमधून लोरेन्सला गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून ३ कोटी ९० लाख किमतीचे १ किलो ३०० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. 
nआझाद मैदान युनिटने केलेल्या कारवाईत २४ तारखेला मालाडच्या अशरफ अजगर सय्यद (३०) याला अटक केली आहे. त्याच्याकडून १० लाख ८ हजार रुपये किमतीचे चरस जप्त केले आहे. त्याच्या चौकशीत हे ड्रग्ज मोहम्मद इरफान शेख याच्याकडून घेतल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने शेखला अटक केली. त्याच्याकडे १६ लाख २० हजार रुपये किमतीचे चरस सापडले. दोन्ही कारवायांत एकूण २६ लाख २८ हजार किमतीचा १ किलो ३१४ ग्रॅम साठा मिळाला. तो बिहारमधून चरस आणून त्याची विक्री करत होता.

Web Title: More than 15 people arrested in anti-drug operation pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.