अश्लील फोटोद्वारे ६०० पेक्षा जास्त महिलांना केलं ब्लॅकमेल, नराधमाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 08:14 PM2022-07-22T20:14:34+5:302022-07-22T20:42:55+5:30

Molestation Case : धारावी परिसरात राहणारा आरोपी रवी दांडू हा डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून एका कंपनीत काम करतो.

More than 600 women were blackmailed through obscene photos, chained to murder | अश्लील फोटोद्वारे ६०० पेक्षा जास्त महिलांना केलं ब्लॅकमेल, नराधमाला बेड्या

अश्लील फोटोद्वारे ६०० पेक्षा जास्त महिलांना केलं ब्लॅकमेल, नराधमाला बेड्या

googlenewsNext

मुंबई : अल्पवयीन मुलींसह महिलांना मोबाईलवरुन अश्लील क्लिप पाठवणाऱ्या एका नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत त्याने ६०० पेक्षा जास्त महिलांना त्रास दिल्याचं उघडकीस आलं आहे. त्यांचे फोनही हॅक केल्याचं समोर आलं आहे.

धारावी परिसरात राहणारा आरोपी रवी दांडू हा डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून एका कंपनीत काम करतो. त्याला महिलांविषयी वाटणाऱ्या आकर्षणामुळे तो सोशल मीडियावर सुंदर मुलींचे फोटो न्याहाळत असे. त्यांचे फोटो डाऊनलोड करुन, मॉर्फ करुन अश्लील फोटो तयार करायचा. त्याद्वारे तो या महिलांकडे शरीरसुखाची मागणी करायचा. काही मुलींचे फोन हॅक करुन त्यांची बदनामी देखील करत असे.  आतापर्यंत आरोपीने ६०० हून जास्त महिलांना ब्लॅकमेल केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 

अलीकडेच रवीने ब्लॅकमेलिंगची पद्धत बदलली होती. विद्यार्थिनींजवळ जाऊन बतावणी करायचा की, आपणही विद्यार्थी आहे आणि अभ्यासाच्या सामग्रीची देवाणघेवाण करण्याच्या बहाण्याने whats App गृपला ऍड व्हायला सांगायचा. त्यासाठी तो एक लिंकबनवून मुलींना पाठवायचा ही लिंक ओपन केल्यानंतर त्यावर येणारा ओटीपी शेअर करायला सांगून तो मिळताच मुलीच्या संपूर्ण मोबाइलचा ताबा तो स्वत:जवळ ठेवायचा.

सायन येथील मुलीला त्याने अशा प्रकारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तिचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तिच्या ३५ मित्र मैत्रिणींना पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, ही बाब मुलीने घरातल्यांना सांगितल्यानंतर घरच्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानुसार अंधेरी पोलिसांनी रवी दांडूवर गुन्हा दाखल केला आणि नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या तक्रारीनंतर अजूनही पीडित मुली तक्रार देण्यास पुढे येऊ शकतात अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यांची माहिती गुप्त ठेवली जाईल असे देखील पोलीस पुढे म्हणाले. 

Web Title: More than 600 women were blackmailed through obscene photos, chained to murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.