माझ्या कारकिर्दीतील सर्वात जटिल केसचा गुंता सुटला, शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 06:58 PM2021-03-21T18:58:20+5:302021-03-21T18:59:50+5:30

Mansukh Hiren : गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस एक करून याप्रकरणी न्याय्य पद्धतीने काम केलेल्या माझ्या एटीएस पोलिस दलाच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून अभिवादन करतो.

The most complicated case of my career was solved, Shivdeep Lande's Facebook post | माझ्या कारकिर्दीतील सर्वात जटिल केसचा गुंता सुटला, शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट 

माझ्या कारकिर्दीतील सर्वात जटिल केसचा गुंता सुटला, शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट 

googlenewsNext
ठळक मुद्देNIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता एटीएसने ठाणे कोर्टातून परवानगी देखील मिळवली आहे.

एकीकडे राज्यात सचिन वाझेंना (Sachin Vaze) महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांनी आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Param Bir Singh)  यांनी केल्याने खळबळ उडालेली असताना दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस विनायक शिंदे (५१) आणि बुकी असलेला नरेश गोर (३१) याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. त्यानंतर राज्याच्या एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट करून अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खून प्रकरणातील गुंता सुटला असल्याची माहिती दिली आहे. 

 

तसेच शिवदीप लांडे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस एक करून याप्रकरणी न्याय्य पद्धतीने काम केलेल्या माझ्या एटीएस पोलिस दलाच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून अभिवादन करतो. माझ्या पोलिस कारकीर्दीची आजपर्यंतची ही सर्वात जटिल घटना होती. असे नमूद केले आहे. सचिन वाझे यांचा ताबा एटीएसला हवा आहे. त्यासाठी सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

डॅशिंग अधिकारी शिवदीप लांडे ATS कार्यालयात, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महत्त्वाची चर्चा ATS DIG Shivdeep Lande at Thane ATS Office to discuss on Mansukh Hiren Death Case | TV9 Marathi

सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच वाझे यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे ठोस पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु असून अनेक जबाब देखील घेण्यात आले आहेत. कोर्टात एटीएसने तब्बल ४ पानांचा अहवाल दिला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. NIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता एटीएसने ठाणे कोर्टातून परवानगी देखील मिळवली आहे.

 

 

अति संवेदनशील मनसुख हिरेन मर्डर केस की गुत्थी सुलझी। मैं अपने पूरे ATS पुलिस फ़ोर्स के सभी साथियों को दिल से सैलूट करता...

Posted by Shivdeep Wamanrao Lande on Sunday, March 21, 2021

Web Title: The most complicated case of my career was solved, Shivdeep Lande's Facebook post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.