मुलीशी मैत्री केल्याने भररस्त्यात विद्यार्थ्याची हत्या, पोलिसांवर आईने केला आरोप
By पूनम अपराज | Published: October 10, 2020 06:43 PM2020-10-10T18:43:41+5:302020-10-10T18:44:17+5:30
Murder of Student : या विषयावर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन म्हणाले की, दिल्ली पोलीस किंवा कायदा व सुव्यवस्था माझ्या अधीन नसून केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. पोलिस परिस्थिती योग्य प्रकारे हाताळू शकत नाहीत. याबाबत उपराज्यपालांना विचारा.
दिल्लीतील आदर्श नगर भागात दुसर्या समाजातील अल्पवयीन मुलीच्या मैत्रीमुळे विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. त्याचबरोबर हिंदूवादी संघटनेचे लोकही पीडितेच्या कुटूंबाला भेटण्यासाठी पोहोचत आहेत.
या विषयावर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन म्हणाले की, दिल्ली पोलीस किंवा कायदा व सुव्यवस्था माझ्या अधीन नसून केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. पोलिस परिस्थिती योग्य प्रकारे हाताळू शकत नाहीत. याबाबत उपराज्यपालांना विचारा.
मृत विद्यार्थी राहुलची आई म्हणाली की, सुरुवातीला पोलिसांनीही गुन्हा नोंदण्यास नकार दिला. कारण दुखापत फारशी दिसत नव्हती. पण त्याला अंतर्गत दुखापत झाल्याचे नंतर उघडकीस आले. राहुलने सांगितले की, राहुलच्या अंगावर कोणताही जखम नव्हती म्हणून पोलिस गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. काका धरमपाल यांनीही राहुलच्या आईशी होकार दर्शविला आणि ते म्हणाले की, ज्या लोकांनी राहुलची हत्या केली त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती नाही.
ही घटना बुधवारी संध्याकाळीची आहे. पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली आणि तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. हे सर्व अल्पवयीन मुलीचे निकटचे नातेवाईक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षांचा राहुल आदर्श नगर परिसरात राहत होता. ते डीयूच्या एसओएलमधून बीए द्वितीय वर्षाचे शिक्षण घेता घेता ट्युशन शिकवत असे तर वडील संजय हे पेशाने ड्रायव्हर होते. राहुलची आई रेणू म्हणाली की ,घटनेच्या दिवशी राहुलला फोन करून ट्युशनबद्दल बोलण्यासाठी घरी बोलावले.
त्याचवेळी 'आज तक' शी खास बातचीत करताना परिसरातील लोकांनी सांगितले की, ही घटना घडली त्यावेळी बरेच लोक उपस्थित होते. पण कोणाबरोबर भांडत होते, कोणाकोणाला मारहाण करत होतं हे माहित नव्हते. राहुल राजपूत याच्या घरी भेट दिलेले आपचे आमदार पवन शर्मा म्हणाले की, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आम्ही स्वतः पोलिसांकडे गेलो आणि याप्रकरणी एफआयआर दाखल केला. पवन शर्मा म्हणाले की, आम्ही राहुलच्या कुटुंबासमवेत उभे आहोत. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज देखील उघडकीस आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.