धावत्या रेल्वेतून पडून माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 11:20 PM2022-01-03T23:20:04+5:302022-01-03T23:20:38+5:30

Accident : भंडारा जिल्ह्यात माडगी-देव्हाडा वैनगंगा रेल्वे पुलावरील घटना

Mother and son unfortunate death after falling from a running train | धावत्या रेल्वेतून पडून माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू

धावत्या रेल्वेतून पडून माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू

Next

करडी (भंडारा) : नागपूरहून रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने जात असलेल्या माय-लेकाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना देव्हाडा - माडगी वैनगंगा नदी पुलावर घडली. ही घटना सोमवारी दुपारी रेल्वे कर्मचाऱ्यांमुळे उघडकीस आली. 

पूजा इशांत रामटेके (२७) व अथर्व इशांत रामटेके (१८ महिने) रा. टेकानाका (नागपूर) मृत माय-लेकाचे नाव आहे.  
सैनिक असलेला इशांत रामटेके रा. टेकानाका नागपूर हा सुटी संपल्याने कुटुंबासह नागपूर रेल्वेस्थानकाहून रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने निघाला होता. तुमसर रेल्वे स्थानकावरून गाडी पुढील प्रवासात असताना पत्नीला लघुशंका लागल्याने पतीला सांगून ती दीड वर्षाच्या मुलासह रेल्वे डब्यातील प्रसाधनगृहाकडे गेली. त्यावेळी मुलगा धावत-धावत समोर गेला. काही कळण्याच्या आतच माडगी व देव्हाडा दरम्यान वैनगंगा नदी रेल्वे पुलावरुन नदीत पडला. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात महिलेचा तोल जावून ती सुद्धा रेल्वे पुलावर कोसळली. या घटनेत दीड वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर महिलेला पुलाचा मार लागून लटकलेल्या स्थितीत ठार झाली. ही घटना रात्रीदरम्यान घडल्याची प्राथामिक माहिती पोलीसांनी दिली.

बराचवेळा झाल्यानंतरही पत्नी व मुलगा परत न आल्याने पतीने धावत्या रेल्वेत शोधाशोध केली. परंतू शोध न लागल्याने त्याने गोंदिया येथे पत्नी व मुलगा हरविल्याची तक्रार नोंदविली.


सोमवारी रेल्वे कर्मचारी पेट्रोलिंगवर असतांना दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांना एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत तर मुलाचा मृतदेह नदीत आढळून आला. घटनेची माहिती रेल्वे पोलीस व करडी पोलीसाना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. इशांत रामटेके यांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर शव उत्तरीय तपासणीसाठी तुमसर येथे पाठविण्यात आले. तपास करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश वाजे यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.

Web Title: Mother and son unfortunate death after falling from a running train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.