धक्कादायक! एकमेकांच्या मिठीत आईसह दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 20:54 IST2020-05-26T20:53:02+5:302020-05-26T20:54:36+5:30
फॉरेन्सिक तज्ञांची टीम घटनास्थळी पोलिसांसह दाखल झाली.

धक्कादायक! एकमेकांच्या मिठीत आईसह दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ
उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे आई आणि दोन मुलींच्या हत्येने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण औरस पोलिस स्टेशन परिसरातील पूरन खेडा गावचे आहे. गावातील बाहेरील तलावाजवळ सर्व मृतदेह सापडल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृतदेहांच्या गळ्यात कपड्याचा फास होता. फॉरेन्सिक तज्ञांची टीम घटनास्थळी पोलिसांसह दाखल झाली.
मृताचे नाव सरोजिनी आहे. मंगळवारी सकाळी सरोजिनी आणि तिची 8 व 4 वर्षाच्या मुलींचा मृतदेह गावातील तलावाजवळ आढळला. 8 वर्षाच्या मुलीचे नाव शिवानी आहे, तर 4 वर्षाच्या मुलीचे नाव रोशनी आहे. मायलेकी मृत अवस्थेत एकमेकांच्या मिठीत आढळून आल्या होता.
घटनेची माहिती मिळताच उन्नावचे एसपी विक्रांत वीर तीन पोलीस ठाण्यांच्या दलासह घटनास्थळी पोहोचले. तसेच, फॉरेन्सिक तज्ज्ञ पथकही घटनास्थळी बोलावले गेले. पोलिसांनी पती व मेहुण्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. तसेच ग्रामस्थांचा जबाब नोंदविले जात आहेत.
.
Coronavirus : ओशिवरा पोलीस ठाणे बनले कोरोनाचा हॉटस्पॉट
बापरे! विहिरीत पडलेल्या 'त्या' ९ जणांची हत्या फक्त प्रेयसीचा खून लपवण्यासाठीच