Video : बापरे! क्रूर आईने नऊ महिन्याच्या बाळाला केली बेदम मारहाण; Video व्हायरल झाल्यानंतर अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 09:08 PM2022-04-12T21:08:48+5:302022-04-12T21:23:32+5:30

Mother arrested for slapping nine-month-old baby : या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

Mother arrested for slapping, trashing nine-month-old baby mercilessly in Samba | Video : बापरे! क्रूर आईने नऊ महिन्याच्या बाळाला केली बेदम मारहाण; Video व्हायरल झाल्यानंतर अटक

Video : बापरे! क्रूर आईने नऊ महिन्याच्या बाळाला केली बेदम मारहाण; Video व्हायरल झाल्यानंतर अटक

googlenewsNext

जम्मू काश्मीर - आई आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला मांडीवर घेऊन निर्दयीपणे मारहाण करतानाचा एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जम्मू-काश्मीरमधील असल्याचा तपासात समोर आले आहेत. पोलिसांनी संबंधीत आईला अटक केली.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत जम्मू-काश्मीरपोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. व्हिडिओमध्ये एक महिला नऊ महिन्याच्या बाळाला मारहाण करताना दिसत आहे. ही महिला जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी तिला अटक करून संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले असून बाळ सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, एका नातेवाईकाने हा व्हायरल झालेला व्हिडीओ रेकॉर्ड केला. 

Web Title: Mother arrested for slapping, trashing nine-month-old baby mercilessly in Samba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.