मन सुन्न करणारी घटना! १३ महिन्याच्या चिमुकल्याचा गळा चिरुन आईची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 06:11 PM2021-04-14T18:11:42+5:302021-04-14T18:12:19+5:30

Murder And Suicide : उडदी येथील घटना : पुसद तालुक्यातील समाजमन झाले सुन्न

Mother committed suicide by slitting the throat of 13-month-old kid | मन सुन्न करणारी घटना! १३ महिन्याच्या चिमुकल्याचा गळा चिरुन आईची आत्महत्या

मन सुन्न करणारी घटना! १३ महिन्याच्या चिमुकल्याचा गळा चिरुन आईची आत्महत्या

Next
ठळक मुद्देस्वाती ज्ञानेश्वर लोहेकर (२२) असे मृत मातेचे तर वीर ज्ञानेश्वर लोहेकर (१३ महिने) असे मृत बालकाचे नाव आहे.

पुसद (यवतमाळ) : तालुक्यातील उडदी येथे खुद्द मातेनेच १३ महिन्याच्या चिमुकल्याचा गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर आईनेही गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री ७.२० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
स्वाती ज्ञानेश्वर लोहेकर (२२) असे मृत मातेचे तर वीर ज्ञानेश्वर लोहेकर (१३ महिने) असे मृत बालकाचे नाव आहे. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उडदी येथे हृदयाला पाझर फोडणारी ही घटना घडली. स्वातीने प्रथम चिमुकल्या वीरचा धारदार शस्त्राने गळा चिरुन त्याला ठार केले. त्यानंतर तिने मुलाला पलंगावर ठेवून स्वत: घराच्या छताला नॉयलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडून होता.

पोलीस पाटील मिलिंद मधुकर राठोड (३०) यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून मायलेकाचे मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. बीट जमादार प्रशांत भवरे यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. स्वातीने स्वत:च्या मुलाला ठार करून आत्महत्या का केली याचे गूढ अद्याप काय आहे. मात्र या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी घडले अघटित
मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने केली जाते. त्याच दिवशी उडदी येथे खुद्द मातेनेच मुलाची गळा चिरुन हत्या केली आणि आपलीही जीवनयात्रा संपविली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले. हत्या आणि आत्महत्येमागील नेमके कारण शोधून काढण्याचे आव्हान पुसद ग्रामीण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

 

Web Title: Mother committed suicide by slitting the throat of 13-month-old kid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.