५० हजारांचा मेकअप करून ब्युटी पार्लरमधून मायलेकी झाल्या फरार, पोलिसांचे शोधकार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 01:50 PM2022-06-17T13:50:20+5:302022-06-17T13:51:40+5:30

Fraud Case : यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्या महिलांना शोधण्याचे आवाहन केले आहे.

Mother daughter ran away from beauty parlor without paying 50 thousand makeup bill | ५० हजारांचा मेकअप करून ब्युटी पार्लरमधून मायलेकी झाल्या फरार, पोलिसांचे शोधकार्य सुरु

५० हजारांचा मेकअप करून ब्युटी पार्लरमधून मायलेकी झाल्या फरार, पोलिसांचे शोधकार्य सुरु

Next

मेकअप करून घेतल्यानंतर दोन महिलांनी पैसे न देता ब्युटी पार्लरमधून पलायन केले. तिच्या या कृत्याबद्दल ब्युटी पार्लरच्या मालकाने पोलिसांत तक्रार केली आहे. यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्या महिलांना शोधण्याचे आवाहन केले आहे.

जेड अ‍ॅडम्स असे या पार्लरच्या मालकाचे नाव आहे. 28 वर्षीय अ‍ॅडम्सने सांगितले की, दोन दिवसांपूर्वी दोन महिला तिच्या ब्युटी पार्लरमध्ये आल्या होत्या. त्यांनी स्वतःची आई-मुलगी अशी ओळख करून दिली. दोघींनी मेकअपसह बोटॉक्स उपचार आणि इतर महागड्या उपचार घेतले. पण जेव्हा 48,942 रुपये बिल भरण्याची वेळ आली तेव्हा त्या रफूचक्कर झाल्या.

ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या जेड अ‍ॅडम्सने फेसबुकवर महिलेचा फोटो शेअर करताना लिहिले, कृपया चोराचा फोटो शेअर करत आहे. दुर्दैवाने ही महिला आणि तिची मुलगी काल माझ्या क्लिनिकमध्ये सौंदर्य उपचारासाठी आल्या होत्या. पण पैसे न देता ती पळून गेली. अ‍ॅडम्सने सांगितले की, त्या दोघी ज्या पद्धतीने बोलत होत्या त्यावरून ते आयरिश नागरिक वाटत होते.


जेड अ‍ॅडम्सची फेसबुक पोस्ट
याप्रकरणी अ‍ॅडम्स यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितले की, दोन्ही महिलांनी क्लिनिकमध्ये उपचारासाठी (बोटॉक्स आणि लिप फिलर) बुक केले, नंतर मेकअप केला आणि जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा त्या बहाण्याने बाहेर गेल्या आणि परत आल्या नाहीत. अ‍ॅडम्सच्या म्हणण्यानुसार, त्यांचे बिल 48 हजार रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.



अशा प्रकारे क्लिनिकमधून पळून गेला

अ‍ॅडम्स  सांगतात की, आधी एका महिलेने तिचे उपचार करून घेतले आणि ती वेटिंग एरियामध्ये बसली. दुसऱ्या महिलेनेही उपचार करून घेतल्यानंतर पहिल्या महिलेला पैसे भरण्यासाठी फोन करण्यासाठी ती वेटिंग एरियामध्ये आली, मात्र काही वेळातच दोघेही तेथून गायब झाले. तिने पार्लरमध्ये एक बॅग सोडली होती, जेणेकरून लोकांना वाटेल की, ती परत येणार आहे. पण तो फक्त बनाव होता.

'मेट्रो यूके'च्या रिपोर्टनुसार, अॅडम्सने सांगितले की, ती 18 महिन्यांपासून क्लिनिक चालवत आहे, परंतु असे ग्राहक तिने कधी पाहिले नाहीत. फसवणूक करणाऱ्या महिलांना पकडण्यासाठी अॅडम्सने पोलिसांकडे मदत मागितली आहे.

 

 

 

 

 

Web Title: Mother daughter ran away from beauty parlor without paying 50 thousand makeup bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.