आईने 16 वर्षांच्या मुलीची 8 वेळा 'बीजांडी' विकली, सावत्र पित्यावर बलात्काराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 07:35 PM2022-06-07T19:35:27+5:302022-06-07T19:44:09+5:30

Crime News : तपासादरम्यान, अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्यानेच पाच वर्षांत अनेक वेळा बलात्कार केल्याचे पोलिसांना आढळून आले.

Mother donates eggs of 16-year-old daughter 8 times, accuses stepfather of rape | आईने 16 वर्षांच्या मुलीची 8 वेळा 'बीजांडी' विकली, सावत्र पित्यावर बलात्काराचा आरोप

आईने 16 वर्षांच्या मुलीची 8 वेळा 'बीजांडी' विकली, सावत्र पित्यावर बलात्काराचा आरोप

Next

तामिळनाडूतील इरोड येथील एका प्रायव्हेट फर्टिलिटी क्लिनिकमध्ये 16 वर्षीय मुलीला एकदा नव्हे तर आठ वेळा अंडी दान करण्यास भाग पाडण्यात आले. मुलीला असे करण्यास भाग पाडणाऱ्या 3 जणांना पोलिसांनीअटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक पीडितेची आई आहे. याप्रकरणी आता आणखी एक नवा खुलासा समोर आला आहे. तपासादरम्यान, अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्यानेच पाच वर्षांत अनेक वेळा बलात्कार केल्याचे पोलिसांना आढळून आले.

एफआयआरनुसार, पीडितेची आई तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली आहे. त्यानंतर तिने दुसऱ्याशी लग्न केले. त्यांच्यासोबत एक अल्पवयीनही मुलगी राहत होता. दोघेही पीडितेला मारहाण करायचे. तिला जबरदस्तीने बीजांडी दान करण्यास भाग पाडले. सावत्र वडील, अन्य एका महिलेसह, एका प्रायव्हेट फर्टिलिटी क्लिनिकमध्ये अल्पवयीन मुलीला बीजांडी दान करण्यास सांगायचे.

दुसऱ्या आरोपी महिलेने अल्पवयीन मुलीचे बनावट आधार कार्ड बनवून पाच हजारांचे कमिशन घेतले होते. त्याचवेळी आरोपी आईने मुलीची बीजांडी 20 हजार रुपयांना विकली होती. पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कायद्याच्या अनेक कलमांखाली, IPC कलम 420 (फसवणूक) आणि 506 (ii) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीची 33 वर्षीय आई, तिचा 40 वर्षीय सावत्र पिता आणि आणखी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तिघेही सालेम मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत. आई आणि सावत्र वडिलांच्या छळाला कंटाळलेल्या या अल्पवयीन मुलीने मे महिन्यात सालेम येथील नातेवाइकांच्या घरी पळून जाऊन आपला त्रास सांगितला,तेव्हा ही बाब उघडकीस आली.

दरम्यान, मुलीची आई आणि इतर दोघे सालेम येथे आले, असे पोलिसांनी सांगितले. त्यांनी मुलीला धमकावून पुन्हा इरोडला नेले. मुलीच्या नातेवाइकांनी आरोपी आई आणि इतर दोघांविरुद्ध इरोड दक्षिण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली.

वैद्यकीय आणि ग्रामीण आरोग्य सेवा संचालनालयाच्या सहा सदस्यीय पथकाने या प्रकरणाचा तपास केला असता, गेल्या पाच वर्षांत मुलीला तिची बीजांडी विविध प्रजनन केंद्रांना विकण्यास भाग पाडण्यात आले. वैद्यकीय व ग्रामीण आरोग्य सेवा सहसंचालक ए. विश्वनाथन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ६ जून रोजी अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला.

सोमवारी अधिकाऱ्यांनी इरोडमधील दोन खासगी रुग्णालये आणि सेलममधील दोन खासगी रुग्णालयांची तपासणी केली. त्याचबरोबर राज्यातील इतर प्रजनन केंद्रांमध्येही तपासणी सुरू आहे. रुग्णालयांचीही यात काही भूमिका आढळून आल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणातील डॉक्टरांचाही सहभाग तपासण्यात येणार आहे.

 

 

Web Title: Mother donates eggs of 16-year-old daughter 8 times, accuses stepfather of rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.