जन्मदात्या आईनेच पाजले तीन वर्षांच्या मुलीला उंदीर मारण्याचे औषध 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 01:49 PM2019-08-22T13:49:24+5:302019-08-22T13:55:19+5:30

कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याने त्याने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली.

A mother given rat killed liquid to three-year-old girl | जन्मदात्या आईनेच पाजले तीन वर्षांच्या मुलीला उंदीर मारण्याचे औषध 

जन्मदात्या आईनेच पाजले तीन वर्षांच्या मुलीला उंदीर मारण्याचे औषध 

googlenewsNext
ठळक मुद्देआईने ते पिल्याने तिचाही उपचारादरम्यान मृत्यू

नऱ्हे : जन्मदात्या आईनेच तीन वर्षांच्या मुलीला उंदीर मारण्याचे औषध पाजून स्वत:ही ते पिल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, गोकुळा शामराव साबळे (वय २५) असे मृत महिलेचे नाव असून तिची तीन वर्षांची मुलगी मात्र यातून बचावली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. 
या प्रकरणी शामराव राजाराम साबळे (वय २८, शिवशक्ती पॉवर डिव्हाइस शेजारी, नऱ्हे, मूळ- सिरड, शहापूर, ता. औंढा जि. हिंगोली) याच्यावर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
दारूच्या नशेत शिवीगाळ व हाताने मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने कंटाळून जाऊन रागाच्या भरात उंदीर मारण्याचे औषध पिण्यास प्रवृत्त करून आत्महत्या करण्यास भाग पाडले म्हणून मृत महिलेचा भाऊ कुंडलिक भुरके (वय २८, रा. भोळवा, ता. कळमनुरी, जिल्हा हिंगोली) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रूपाली पाटील करीत आहेत. 
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला गोकुळा व शामराव यांचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पती शामराव हा येथे एका टँकरवर चालक म्हणून कामास होता. तर गोकुळा या साफसफाईचे काम करीत असत. 
* शामराव याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्यांच्यात सतत वाद होत असत. १९ आॅगस्ट रोजी पती शामराव हा नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजता कामावरून दारू पिऊन घरी आला. 
* कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याने त्याने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली.त्यानंतर तो घराबाहेर निघून गेल्यावर तिने घराजवळील मेडिकलमधून उंदीर मारण्याचे औषध घेऊन घरी आली. औषधाच्या पुडीतील काही पावडर तिने स्वत: खाल्ली व स्वत:च्या तीन वर्षांच्या मुलीलाही दिली. 
* उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याने उलट्या होऊ लागल्याने तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. 
नऱ्हे 

Web Title: A mother given rat killed liquid to three-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.