सासूवर पेट्रोल टाकून पेटवून दिले, जावई देखील आगीत कसा होरपळला? पोलिसांना पडले कोडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:52 IST2025-02-05T15:52:30+5:302025-02-05T15:52:49+5:30
केरळच्या पालामध्ये ही घटना घडली आहे. जावयाने सासूला आग लावली तर त्याच्याही जळून कसा मृत्यू झाला असा संशय पोलिसांना येत आहे.

सासूवर पेट्रोल टाकून पेटवून दिले, जावई देखील आगीत कसा होरपळला? पोलिसांना पडले कोडे
कौटुंबिक वादातून एक विचित्र घटना घडली आहे. जावयाने सासूवर पेट्रोल टाकून आग लावली होती. या घटनेत जावयाचा देखील जळून मृत्यू झाला आहे. या घटनेत नेमके काय घडले याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर कोडे बनले आहे.
केरळच्या पालामध्ये ही घटना घडली आहे. जावयाने सासूला आग लावली तर त्याच्याही जळून कसा मृत्यू झाला असा संशय पोलिसांना येत आहे. या दोघांच्या किंचाळ्या ऐकून आजुबाजुचे लोक तिथे पोहोचले होते. त्यांनी फायर ब्रिगेडला बोलविले. या दोघांना लागलेली आग विझविण्यात आली आणि हॉस्पिटलला नेण्यात आले. उपचारावेळी या दोघांचा मृत्यू झाला.
मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ४२ वर्षीय मनोज हा सासरी आला होता. त्याची सासू निर्मला हिच्यासोबत त्याचे भांडण झाले होते, या रागातून त्याने तिच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. सासूला आग लावल्यानंतर तो स्वत: त्या आगीत कसा सापडला असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
पोलिसांनी दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू दोघांचाही बुधवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांच्यात मोठ्या काळापासून कौटुंबिक वाद सुरु होता. यातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.