अंधश्रद्धेपोटी आईनेच केला 6 महिन्यांच्या बाळाचा फावड्याने वार करून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 02:19 PM2023-01-08T14:19:42+5:302023-01-08T14:23:13+5:30

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.

mother killed her 6 month old baby by stabbing her with a shovel | अंधश्रद्धेपोटी आईनेच केला 6 महिन्यांच्या बाळाचा फावड्याने वार करून खून

अंधश्रद्धेपोटी आईनेच केला 6 महिन्यांच्या बाळाचा फावड्याने वार करून खून

Next

UP Crime News: उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये आज(रविवार) एका आईने आपल्या 6 महिन्यांच्या बाळाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंधश्रद्धेतून महिलेने ही घटना घडवून आणल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले. सोबतच या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.

हे संपूर्ण प्रकरण गोसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील धनौडीह कुटिया गावाशी संबंधित आहे. याच गावातील शिवकुमार यांची पत्नी मंजू उर्फ ​​राधा ही आपल्या 6 महिन्यांच्या मुलाला घेऊन गावाबाहेरील 'देव' ठिकाणी पोहोचली. यावेळी मंजूने आपल्या चिमुरड्याचा फावड्याने वार करून खून केला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेतून मंजूने ही घटना घडवून आणल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी आईला ताब्यात घेतलले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू झाला आहे. मात्र, पोलिसही या प्रकरणाला अंधश्रद्धेशी जोडून पाहत आहेत. पोलीस अधीक्षक सोमेन बर्मा यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. प्रकरण अंधश्रद्धेशी संबंधित असेल किंवा इतर काही, पण या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

Web Title: mother killed her 6 month old baby by stabbing her with a shovel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.