चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 09:04 PM2020-08-19T21:04:02+5:302020-08-19T21:07:56+5:30

रायपाटण दूरक्षेत्राचे प्रमुख हितेंद्र चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

The mother killed herself along with the minor girls, incident at Raipatan in Rajapur taluka | चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

googlenewsNext
ठळक मुद्देसुहासिनी सुभाष सावंत (४०) असे या महिलेचे नाव असून, जान्हवी सुभाष सावंत (६) व मनस्वी सुभाष सावंत (९) अशी त्या दोन लहानग्या मुलींची नावे आहेत.रायपाटणचे पोलीस पाटील मनोज गांगण यांनी तात्काळ रायपाटण दूरक्षेत्रात खबर दिली.

राजापूर : तालुक्यातील रायपाटण खाडेवाडी येथील एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहानग्या मुलींसह आपले जीवन संपविले आहे. या महिलेने आपल्या सहा व तीन वर्षाच्या दोन्ही मुलींना ओढणीने गळफास लावून नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. बुधवारी हा प्रकार घडला. सुहासिनी सुभाष सावंत (४०) असे या महिलेचे नाव असून, जान्हवी सुभाष सावंत (६) व मनस्वी सुभाष सावंत (९) अशी त्या दोन लहानग्या मुलींची नावे आहेत. या आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष महादेव सावंत, त्यांची पत्नी सुहासिनी, जान्हवी व मनस्वी या दोन मुली तसेच सुभाष यांचे आईवडील व भाऊ असे सात जणांचे कुटुंब रायपाटण खाडेवाडी येथे राहते. बुधवारी सायंकाळी सुभाष व त्याचा भाऊ शेतावर गेले होते, तर त्याचे आईवडीलही बाहेर गेले होते. सुहासिनी दोन मुलींसह घरात होती. सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान सुभाष व त्यांचा भाऊ घरी आले. त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा आतून कोयंडा लावून बंद केलेला होता. हाक मारूनही पत्नीने प्रतिसाद न दिल्याने सुभाष यांनी आपल्या भावाला मागच्या दरवाजाने  जाण्यास सांगितले. मात्र तो दरवाजाही बंद होता. त्यामुळे बाहेरून कोयंडा काढून सुभाष यांनी घरात प्रवेश केला. मात्र पत्नी व दोन्ही मुली त्यांना मृतावस्थेत आढळली. हा प्रकार पाहून हादरून गेलेले सुभाष व त्यांच्या भावाने आराडाओरड केली. यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी सावंत यांच्या घराकडे धाव घेतली. रायपाटणचे पोलीस पाटील मनोज गांगण यांनी तात्काळ रायपाटण दूरक्षेत्रात खबर दिली.

रायपाटण दूरक्षेत्राचे प्रमुख हितेंद्र चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार समजताच राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर हेही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. सुभाष यांच्यासह कुटुंबातील सगळ्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. या महिलेच्या माहेरीही तत्काळ याबाबत माहिती देण्यात आली असून, त्यांचेही जबाब नोंदविले जाणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र या आत्महत्येचे नेमके कारण अजून उलगडलेले नाही.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

 

दाऊदच्या हस्तकाने केला मोठा खुलासा, नेपाळमधून भारतात पाठवत होता नकली सोनं अन् नोटा 

 

सेक्स रॅकेटचा भांडाफोड, युनिसेक्स स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय अन् आक्षेपार्ह वस्तू सापडल्या

 

सुशांत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली प्रतिक्रिया 

 

वापरलेले वैद्यकीय हातमोजे विकणारा अटकेत, गुन्हे शाखेची करावाई 

 

 

Web Title: The mother killed herself along with the minor girls, incident at Raipatan in Rajapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.