अरे देवा! प्रियकराच्या मदतीने आईनेच मोठ्या मुलाची केली हत्या आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 01:03 PM2022-08-06T13:03:09+5:302022-08-06T13:04:01+5:30

Crime News : अंजली नावाच्या एका महिलेने 21 जुलैला पती अनुज कुमार उर्फ समरची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आणि सांगितलं होतं की, तिचा पती 18 जुलैपासून बेपत्ता आहे.

Mother kills elder son with help of boyfriend and then... | अरे देवा! प्रियकराच्या मदतीने आईनेच मोठ्या मुलाची केली हत्या आणि मग...

अरे देवा! प्रियकराच्या मदतीने आईनेच मोठ्या मुलाची केली हत्या आणि मग...

googlenewsNext

Crime News : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाजियाबाद जिल्ह्यात मोदी नगर पोलिसांनी आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या मोठ्या मुलाची हत्या करण्याप्रकरणी एक महिला आणि तिच्या लहान मुलाला शुक्रवारी अटक केली. जे हत्या केल्यानंतर फरार होते. पोलीस अधिक्षक इराज राजा यांनी सांगितलं की, अंजली नावाच्या एका महिलेने 21 जुलैला पती अनुज कुमार उर्फ समरची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आणि सांगितलं होतं की, तिचा पती 18 जुलैपासून बेपत्ता आहे.

अधिकारी इराज राजाने सांगितलं की, नंतर तीन ऑगस्टला अंजलीच्या भावाने पोलिसांना सूचना दिली की, त्याचा भाओजी अनुजचा मृतदेह निवाडी रोडवरील दरग्याच्या मागे पडला आहे. राजानुसार, अंजलीने मृतदेह सापडल्यानंतर सासू कृष्णा देवी आणि त्यांचा लहान मुलगा अभिषेक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

राजा यांनी सांगितलं की,  अंजलीने तक्रारीत कृष्णा देवीचा कथित प्रियकर देवेंद्रवर आरोप केला की, त्याने अनुजची हत्या करण्याची तिची मदत केली. तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी कृष्णा आणि अभिषेकला अटक केली. चौकशी दरम्यान कृष्णा देवीने तिचे देवेंद्रसोबत अनैतिक संबंध असल्याचं मान्य केलं.

पोलीस अधिक्षकांनी सांगितलं की, तिघांनी मिळून अनुजची गळा आवळून हत्या केली होती आणि मृतदेह दरग्याच्या मागे फेकला होता. पोलिसांनुसार, कृष्णा आणि अभिषेकला शुक्रवारी राज टॉकीजच्या चौकातून अटक करण्यात आली. राजा यांनी दावा केला की, पोलीस देवेंद्रच्या ठिकाणांवर छापेमारी करत आहेत आणि लवकरच त्याला अटक केली जाईल.

Web Title: Mother kills elder son with help of boyfriend and then...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.