धक्कादायक! छोट्याला दाखवून मोठ्या भावाशी लावून दिलं लग्न, सासूने चारही मुलांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 09:43 AM2021-01-11T09:43:35+5:302021-01-11T09:44:37+5:30

इथे एका मुलीचं लग्न लहान भावाऐवजी मोठ्या भावासोबत लग्न लावून दिलं आणि नंतर सासूनेच तिला आपल्या चारही मुलांसोबत अवैध शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं.

Mother in law forces bride to have sexual relations with her four sons marriage fraud in Ghaziabad UP | धक्कादायक! छोट्याला दाखवून मोठ्या भावाशी लावून दिलं लग्न, सासूने चारही मुलांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं....

धक्कादायक! छोट्याला दाखवून मोठ्या भावाशी लावून दिलं लग्न, सासूने चारही मुलांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं....

googlenewsNext

उत्तर प्रदेशातून रोज गन्हेगारीच्या विचित्र आणि धक्कादायक घटना समोर येत असतात. गाझियाबादमधून अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे लग्नानंतर नवरीसोबत अत्याचाराची एक संतापजनक घटना समोर आली आहे. इथे एका मुलीचं लग्न लहान भावाऐवजी मोठ्या भावासोबत लग्न लावून दिलं आणि नंतर सासूनेच तिला आपल्या चारही मुलांसोबत अवैध शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं.

जेव्हा नवी नवरी लग्न होऊन आपल्या सासरी पोहोचली तेव्हा तिने तिच्या पती व्यतिरिक्त कुणासोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. तर तिला मारझोड करण्यात आली आणि असं करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला.
सासरी आपल्यावर सुरू असलेल्या या अत्याचारा कंटाळून ती लग्नाच्या दोन महिन्यांनंतर माहेरी परतली. पीडित महिलेने याची तक्रार गाझियाबाद डीएम यांच्याकडे केली. ज्यानंतर सिहानी गेट पोलीस स्टेशनमध्ये महिलेचा पती आणि सासूसहीत ६ लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

काय आहे नेमकं प्रकरण?

गाझियाबादच्या सिहानी गेट परिसरात १९ वर्षीय नवरी राहते. या मुलीची आई एका सोसायटीमध्ये काम करते. तिथे गार्डची नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून मुलीच्या आईने तिचं लग्न मुरादनगरमधील एका मुलाशी जुळवलं. पण जेव्हा ती लग्न मंडपात पोहोचली तेव्हा ती दुसरीच व्यक्ती नवरदेव बनली होती. 

नंतर समजलं की, जो मुलगा पाहिला होता आणि पसंत केला होता त्याचा हा मोठा भाऊ आहे. मुलीला या मुलासोबत लग्न करायचं नव्हतं. मात्र, वेळेवर आईच्या सांगण्यावरून ती लग्नासाठी तयार झाली. पीडितेनुसार, सासरी गेल्यावर समजलं की, तिच्या पतीला नशेची सवय आहे. पहिल्या रात्रीच तो इंजेक्शन घेऊन झोपला होता.

सासूने केला घात

पीडित महिलेने पुढे सांगितले की, तिच्या पतीला २ मोठे भाऊ आणि एक लहान भाऊ आहे. दोन्ही मोठ्या भावांचं लग्न झालंय. तिच्या सासूने दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलांना आणि लहान दीराला आळीपाळीने अवैध शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पाठवलं. मात्र ती विरोध करून रूममधून बाहेर आली.

मीडिया रिपोर्टनुसार, सासू दररोज हेच करत होती. त्यानंतर सासूने आणि नवऱ्याच्या भावांनी तिला एक दिवस मारहाण केली. तिचे कपडे फाडले. नंतर सासरच्या लोकांनी नवरीच्या आईकडे ट्रक घेण्यासाठी आणि बाइक घेण्यासाठी ३ लाख रूपयांची मागणी केली.

या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत सिहानी गेट पोलीस स्टेशनचे एसएचओ कृष्ण गोपाल शर्मा म्हणाले की, पीडितेची तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपासही सुरू केला. पुराव्यांच्या आधारावर आरोपींवर कारवाई केली जाईल.
 

Web Title: Mother in law forces bride to have sexual relations with her four sons marriage fraud in Ghaziabad UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.