तीन मुलांची आई ड्रायव्हरसोबत गेली पळून, पती म्हणाला - तीन महागडे मोबाइल पाहून आला होता संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 09:20 AM2023-03-24T09:20:38+5:302023-03-24T09:20:56+5:30

पीडित पती म्हणाला की, ड्रायव्हरवर आधीपासूनच संशय होता. त्याने पत्नीला त्याच्यासोबत अनेकदा आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं.

Mother of three children ran away with driver in Purnia Bihar | तीन मुलांची आई ड्रायव्हरसोबत गेली पळून, पती म्हणाला - तीन महागडे मोबाइल पाहून आला होता संशय

तीन मुलांची आई ड्रायव्हरसोबत गेली पळून, पती म्हणाला - तीन महागडे मोबाइल पाहून आला होता संशय

googlenewsNext

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली की, त्याची पत्नी 3 मुलांची आहे आणि ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. त्यांच्या बऱ्याच दिवसांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. पीडितने पोलिसांना सांगितलं की, तो दिवसा गॅरेजमध्ये काम करत होता. यादरम्यान तिचं एका ड्रायव्हरसोबत अफेअर सुरू झालं.

पीडित पती म्हणाला की, ड्रायव्हरवर आधीपासूनच संशय होता. त्याने पत्नीला त्याच्यासोबत अनेकदा आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. त्यानंतर त्याने ड्रायव्हरला मारहाण करून पळवलं होतं. त्याला वाटलं की, आता दोघांमध्ये काही संबंध नाही. पण दोघेही पळून गेले आणि कुणाला काही समजलं नाही. महिलेचा पती पुढे म्हणाला की, घरात त्याला 3 प्रकारचे महागडे मोबाइल दिसले होते, त्यानंतर मी तिच्याशी बोललो होतो.

याप्रकरणी ड्रायव्हर आणि महिलेने फोनवर सांगितलं की, ते त्यांच्या मर्जीने पळाले आहेत. महिला म्हणाली की, तिचं कुणीही अपहरण केलं नाही. ती तिच्या पतीच्या अत्याचाराला वैतागून घर सोडून गेली आहे. सोबतच ती म्हणाली की, ती तिच्या 3 लेकरांची जबाबदारी घेणार नाही, पती घेईल. ती म्हणाली की, ती प्रियकरासोबत मरायला तयार आहे, पण पतीसोबत राहणार नाही.

पोलिसांनी सांगितलं की, चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल. सध्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. लोक या गोष्टीने हैराण आहेत की, एखादी आई आपल्या मुलांना असं कसं सोडून जाऊ शकते. 

Web Title: Mother of three children ran away with driver in Purnia Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.