आईने उशीने तोंड दाबून मुलाचा घेतला जीव अन् स्वतःही घेतला गळफास लावून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 04:28 PM2021-08-10T16:28:16+5:302021-08-10T16:38:53+5:30
Murder And Suicide Case : मुलगा ऑनलाईन अभ्यास करत नसल्याने आईने त्याची हत्या केली. नंतर स्वत: देखील आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नाशिक : मुलगा ऑनलाइन अभ्यास करत नसल्याचा राग अनावर झाल्याने आईने उशीने तोंड दाबून मुलाचा खून केला. नंतर स्वतःही घेतला गळफास लावून आत्महत्या केली. रिधान सागर पाठक असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे तर शिखा सागर पाठक (३०, रा. साईसिद्धी अपार्टमेंट,पाथर्डी फाटा, नाशिक) असे मयत संशयित आरोपी असलेल्याआईचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार शिखा पाठक यांनी सोमवारी (दि. ९) सायंकाळी पाच वाजता त्यांचे आई-वडील घरातील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला. मुलगा रिधान याने अभ्यास करावा, हुशार व्हावे, यासाठी ती सतत त्याला बाेलत असत. साेमवारी तिने रिधान अभ्यास करत नाही, म्हणूण त्याच्या नाकाताेंडावर उशी दाबून हत्या केली. श्वास बंद झाल्याने रिधानच्या नाकातून रक्त येऊन ताे बेडवर निपचित पडला. यानंतर शिखा हिने स्वत:ला गळफास लावून घेत आत्महत्या केली. मुलगी आणि नातू घरातून बाहेर येत नाही म्हणून तिच्या आई वडिलांनी आरडाओरड करुन दार जोरजोरात वाजवायला सुरुवात केली. मात्र शेवटी जावयाच्या मदतीने दार ताेडले असता दाेघे मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सहाय्यक पाेलिस आयुक्त सोहेल शेख घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे. कुणाचीही तक्रार नसल्याने व तिच्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत कोणाविरुद्ध तक्रार आढळलेली नसल्याने तसेच प्रत्यक्ष ठिकाणावरील परिस्थितीनुसार शिखाने मुलाची हत्या करुन नंतर आत्महत्या केल्याचे निष्पन्न हाेत आहे. त्यानुसार तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे माईनकर यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखा सागर पाठक (३२) यांनी सोमवारी त्यांच्या राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरुमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने तोंड दाबून खून केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मुलगा ऑनलाईन अभ्यास करत नसल्याने आईने त्याची हत्या केली. नंतर स्वत: देखील आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. मृतदेहाजवळ ही सुसाईड नोट आढळून आली आहे. या सुसाईड नोटमध्ये माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये, असं मृतक महिलेने लिहिलं आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.