जन्मदात्या आईचा दिव्यांग मुलीला सांभाळण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 03:50 PM2020-02-27T15:50:31+5:302020-02-27T15:52:12+5:30
दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून तसे प्रतिज्ञापत्र कौटूंबिक न्यायालयाला सादर केले आहे. मात्र या सगळयात पत्नीने आपण आपल्या दिव्यांग मुलीला सांभाळण्यास तयार नाही. अशी अट त्यात नमुद केली आहे.
युगंधर ताजणेपुणे :
सतत घालून पाडून बोलणे, अपमानित करणे, घरच्यांसमोर शिवीगाळ करणे, रागाच्या भरात घरातील कुठलीही वस्तु फेकून मारणे याचा वीस वर्षांहून अधिक काळ मानसिक तसेच शारिरीक त्रास करणा-या पतीने पत्नीविरोधात अखेर घटस्फोटाचा दावा दाखल केला. दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून तसे प्रतिज्ञापत्र कौटूंबिक न्यायालयाला सादर केले आहे. मात्र या सगळयात पत्नीने आपण आपल्या दिव्यांग मुलीला सांभाळण्यास तयार नाही. अशी अट त्यात नमुद केली आहे.
अरुण आणि संगीता (नाव बदलले आहे) यांचा 16 वर्षांपूर्वी विवाह झाला. सर्व काही सुखात चालले होते. मात्र संगीताची सततची होणारी चिडचिड अरुणसाठी नवीन होती. त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. संगीता काही केल्या ऐकेना. ती अरुणच्या घरच्यांदेखत त्याचा अपमान करत असे. त्याला वाटेल तसे बोलायची. यामुळे अरुणची डोकेदुखी वाढत चालली होती. लग्न झाल्यानंतर तिने अरुण सोबत शाररीक संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिला.
याविषयी त्याने तिला विचारले असता ती काहीच बोलत नसे. याबाबत अनेकदा तिची समजुत घातल्यानंतर देखील तिच्या वागण्यात कुठलाही फरक पडला नाही. या सर्व गोष्टी संसाराला बाधा आणणा-या आहेत असा विचार करुन अरुणने घटस्फोटाचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला. अॅड. विकास शिंदे यांच्यामार्फत त्यांनी दावा दाखल केला. लग्नानंतर काही महिन्यांनी अरुण एका मित्राच्या लग्नाला गेला. तिथे तो संगीताला बरोबर घेउन गेला होता. मित्रांबरोबर चर्चा करताना झालेल्या चुकीच्या गैरसमजुतीतून संगीताने तिथे त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात के ली. यासगळया प्रकाराने विशेषत: संगीताच्या विक्षिप्त स्वभावाने अरुण पुरता खचला होता.
मुलीच्या वेळेस गरोदर असताना वेळेवर औषधोपचार न घेणे, रात्री उठून भांडण करणे एवढेच नव्हे तर रागाच्या भरात आपल्या गर्भावरच संगीताने फटके मारले. यासगळया कृतीचा परिणाम म्हणजे तिने एका दिव्यांग मुलीला जन्म दिला. मात्र तिच्या संगोपनात टाळाटाळ करु लागली. आता ती मुलगी 14 वर्षांची झाल्यानंतर तिची सर्व जबाबदारी वडिलांवर येऊन पडली आहे. अशावेळी परस्पर संमतीने एकत्र येण्याऐवजी आपण कुठल्याही परिस्थितीत मुलीला सांभाळण्यास तयार नसल्याचे तिने सांगितले. मुलाचा जन्म झाल्यानंतर देखील तिच्या स्वभावात कुठलाच फरक पडला नसल्याचे अरुणने न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
म्हणून सतत जवळ लिंब ठेवायची ....
घरातली माणसे चांगली नाहीत यासाठी एका मांंत्रिकाच्या साह्याने संगीताने काही अघोरी प्रकार करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एक म्हणजे सतत जवळ लिंबु बाळगणे हा एक प्रकार होता. तसेच अंगारा जवळ ठेवून तिने पतीला या लिंबाला तसेच अंगा-याला घराबाहेर टाकून देऊ नये अशी सक्त ताकीद दिली होती.
अशा परिस्थितीत बापाने काय करायचे...
नवरा बायकोचे भांडण हा नवीन विषय नाही. मात्र त्यावर समजुतीने विचार करुन एकत्र येण्यात शहाणपण आहे. अनेक उच्चविद्याविभुषित जोडपी याकडे दुर्लक्ष करतात.या प्रकरणात दिव्यांग मुलीला मासिक पाळी सुरु झाली असून त्यासंबंधीची सर्व काळजी वडिलांना घ्यावी लागत आहे. यासगळयात आईची भूमिका महत्वाची असताना त्यात टाळाटाळ होत आहे. - (अॅड.विकास शिंदे - कौटूंबिक न्यायालय)